पुणे

शाळा सुरू;पण अडखळतच;महापालिकेच्या निम्म्याच शाळा उघडल्या

सकाळवृत्तसेवा

पुणे - तब्बल नऊ महिन्यांनंतर पुण्यातील शाळा सुरू झाल्याने काही प्रमाणात का होईना गजबजून गेल्या. पहिल्या दिवशी ६६ शाळा सुरू होणार होत्या. मात्र, शिक्षकांच्या कोरोना चाचणीस विलंब, संमतिपत्रांची संख्या कमी असल्यामुळे महापालिकेची परवानगी मिळू न शकल्याने अनेक शाळांचे टाळे उघडलेच नाही. महापालिकेच्या ४४ पैकी २२ शाळा आज सुरू झाल्या. मात्र, खासगी शाळांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांत शाळा सुरू होण्यासह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. 

राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शहरात सुरुवातीला पालकांचा विरोध, प्रशासनाची अपुरी तयारी, कोरोनाचे संक्रमण, यामुळे शाळा सुरू होण्याची घोषणा केली तरी तीनवेळा तारखा बदलण्यात आल्या. अखेर ४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा ठाम निर्णय महापालिकेने घेतला. शहरात ५२९ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यातील खासगी २२ आणि महापालिकेच्या ४४ अशा ६६ शाळा सुरू होतील, असे प्रशासनाने सांगितले. मात्र, यापैकी अनेक शाळा पहिल्या दिवशी सुरूच झाल्या नाहीत. 

महापालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिवाजी दौंडकर म्हणाले, ‘‘महापालिकेच्या ४४ शाळांपैकी २२ शाळा सामाजिक संस्थांद्वारे चालविल्या जातात, त्या मंगळवारपासून सुरू होणार आहेत. पालिका प्रशासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या २४ पैकी २२ शाळा आज सुरू झाल्या. त्यामध्ये नववीचे १३६, दहावीचे २२६ आणि बारावीचे ३२ विद्यार्थी उपस्थित होते.

कोरोना अहवालाची प्रतीक्षा 
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय व आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारपर्यंत २३२ शाळांची तपासणी केली. तसेच, शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्णता केलेल्या २२ शाळांना परवानगी दिली. मात्र, अद्याप संमतिपत्रांची संख्या कमी असल्याने शाळा सुरू करण्यास तीन-चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. तसेच, महापालिकेने काही शाळांना परवानगी दिली असली तरी सर्व शिक्षकांचे कोरोना अहवाल आल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात, अशी अट टाकल्याने या शाळा सुरू झालेल्या नाहीत.

महापालिकेने यापूर्वी २३२ शाळांची तपासणी केली होती; त्यात सोमवारी दुपारपर्यंत आणखी १५० शाळांची भर पडली. त्यापैकी ८२ खासगी शाळांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा त्यांच्या स्तरावर नियोजन करून व नियमांचे पालन करून सुरू करण्यात येतील.
- सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT