नळाला आले फेसाळलेले पाणी sakal
पुणे

एक दिवसांच्या क्लोजरनंतर नळाला आले फेसाळलेले पाणी

गुरवारनंतर शुक्रावारीही पाणी नाही; कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : महापालिकेच्या वडगाव व लष्कर जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने गुरुवारी शहरातील काही ठिकाणचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, याचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला असून गुरुवारी तर नाहीच पण शुक्रवारीही काही ठिकाणी पाणी व्यवस्थित मिळाले नाही. तर काही ठिकाणी नळाला फेसाळालेले पाणी आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात नळाला आलेले पाणी पिण्यायोग्य तर नाहीच पण सांडपाणी म्हणून वापरण्यायोग्यही नव्हते. पाणी पुरवठा बंद करतेवेळी दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असे सांगण्यात आले होते. परंतु, कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील कात्रज, सुखसागर नगर, कोंढवा रस्ता, गोकुळनगर, साईनगर, शिवशंभोनगरमधील काही भागात फेसाळलेले गढूळ पाणी आले होते. मोठ्या सोसायट्यांमध्ये पाणी साठवण्याच्या क्षमतेच्या तुलनेत नागरिकांची संख्या मोठी असते.

त्यामुळे साठवण क्षमता आणि लागणारे पाणी यामध्ये मोठा फरक असल्याने एक दिवस पाणी नाही आले तरी त्रास सहन करावा लागतो. मात्र, एका दिवसानंतर खराब पाणी आले किंवा पाणी आले नाही तर मात्र नागरिकांची धावपळ होते. फेसाळलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.गुरुवारी पाणी आले नाही. शुक्रवारीही सायंकाळच्या वेळी पाणी आले मात्र, ते फेसाळलेले होते. आलेले पाणी पिण्यायोग्य तर नाहीच पण सांडपाणी म्हणूनही वापरण्यायोग्य नव्हते. सुरुवातीला तर पाण्याला एक प्रकारचा उग्र वास येत होता. - सोनल सस्ते, स्थानिक नागरिकएक दिवसाच्या क्लोजरमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आमच्याकडून पाईपलाईची तपासणी सुरु असून लवकरच हा पाणीपुरवठा सुरळित होईल आणि गढूळ पाणी येणार नाही.

- शांतीलाल कोळेकर, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT