commissioner vikram kumar Sakal
पुणे

Vikram Kumar : पुणे शहरातील अभ्यास करून थकबाकी माफीचा निर्णय घेऊ

पुणे शहरातील मोकळ्या जागा किती आहेत, त्यांचे क्षेत्रफळ किती आहे?, लहान भूखंड किती, मोठे भूखंड किती याची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील मोकळ्या जागा किती आहेत, त्यांचे क्षेत्रफळ किती आहे?, लहान भूखंड किती, मोठे भूखंड किती याची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. ही माहिती आल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच थकबाकीमध्ये सवलत द्यायची किंवा नाही याचा निर्णय घेतला जाईल. अद्याप सवलतीचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी दिले.

शहरातील मोकळ्या जागांसाठी लोक अदालतीच्या माध्यमातून अभय योजना राबविण्याचा प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु आहे. मिळकतकर विभागाने त्याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यनेते आयुक्तांकडे पाठवला आहे. त्यावर आज आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिले.

आयुक्त म्हणाले, ‘मोकळ्या जागांवरील मिळकतकराची थकबाकी माफ करण्याचा निर्णय झालेला नाही. सध्या या संदर्भात चर्चा सुरु आहे, तसेच यासाठीची आकडेवारी संकलनाचे काम सुरु आहे. ती आल्यानंतर योजना राबवावी की नाही याचा निर्णय घेऊ.

आत्तापर्यंत एकदाही मोकळ्या जागांसाठी अभय योजना राबविली नाही, त्यामुळे यासंदर्भातील विचार सुरु आहे. मोकळ्या जागा फक्त राजकीय किंवा बांधकाम व्यावसायिकांकडेच आहेत असे नाही. तर सर्वसामान्य नागरिकांकडे छोटे प्लॉट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT