Pune Election Eskal
पुणे

Pune Election : पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांनी दिला कार्यकर्त्यांना धीर, म्हणाले...

खचून जाऊ नका, नव्या जोमाने कामाला लागा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेली पुण्यातील कसबा आणि चिंचवड निवडणूक पार पडली. या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आले. गेल्या 30 वर्षांपासून एकहाती असणारी कसबा पेठेतील सत्ता महाविकास आघाडीने मिळवली. हा भाजपचा मोठा पराभव असल्याचं बोललं जात आहे. अशातच ही हार आम्ही मान्य करतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं होतं.

अशातच आता या निवडणुकीच्या निकालानंतर शांत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना बूस्ट करण्याचं काम भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. खचून जाऊ नका, नव्या जोमाने कामाला लागा, असा सल्ला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्त्यांना आज दिला आहे.

कसबा पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर पालकमंत्री यांच्याकडून कार्यकर्त्यांना बूस्ट करण्याचं काम चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राहिलेले हेमंत रासने यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थितीत होते.

कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचून जाऊ नका. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा. नव्या जोमाने आणि ताकदीने कामाला लागा असा सल्ला यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

गेल्या 30 वर्षापासून भाजपची सत्ता एकहाती सत्ता होती. परंतु यावेळी महाविकास आघाडीने याठिकाणी दणदणीत विजय मिळवला आहे. तर चिंचवडमध्ये भाजपने पुन्हा विजय मिळवला परंतु भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जोमाने कम करून पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागा असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला, शाहिद आफ्रिदीचा सूर बदलला; आता म्हणतो, भारतच दावेदार होता, संजू सॅमसन....

Latest Marathi News Live Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

Sambhajinagar Panchayat Samiti : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वी गोंधळ; ठाकरेंच्या गटाचे तीन सदस्य गायब

Woman Success Story: राेपवाटिकेच्‍या पश्चिम महाराष्ट्रात १३ शाखांद्वारे राेजगार; शारदा भाेसलेंची नावीन्यपूर्ण यशस्‍वी भरारी, राज्यभर बाेलबाला!

"आमच्यात फक्त मैत्री.." विशालसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर रुचिताचा खुलासा ! म्हणाली..

SCROLL FOR NEXT