Pune Accident Esakal
पुणे

Pune Accident: तेल टँकर अपघातानंतर प्रशासनाची मूठमाती, नगर हायवेवर ट्रॅफिकचा बोजवारा

तेलाचा टँकर पलटला, त्यावर माती टाकली प्रशासनाचं काम संपलं पण...

अंकिता खाणे (Ankita Khane)

अहमदनगर रस्त्यावर खराडी चंदननगर परिसरात मंगळवारी एक मोहरीच्या तेलाचा टँकर बीआरटी मार्गात पलटी झाला आहे. पलटी झालेल्या टँकरचा चालक पळून गेला असून टँकरमधील निम्मे तेल नगर रस्त्यावर वाहून आले आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. (Latest Marathi News)

रस्त्यावर तेल सांडल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच पुणे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तेल सांडलेल्या जागेवर त्यांनी माती टाकण्याचे काम सुरू केले. सांडलेल्या तेलावरून वाहने घसरू नयेत यासाठी मातीचा वापर करण्यात आला होता. (Latest Marathi News)

मात्र दोन दिवसानंतरही रस्त्यावरील ती माती बाजूला झालेली नाही. आधी तेलाचा आणि आता मातीचा त्रास वाहकांना आणि सामान्यांना होताना दिसून येत आहे. तेलावर टाकलेली माती रस्त्यावरून जाताना हवेमुळे डोळ्यात जात आहे. यामुळे देखील अपघाताची शक्यता आहे.

रस्त्यावर तेल सांडल्याने वाहने घसरून अपघात होण्याचा धोका टाळण्यासाठी टँकर हटवल्यावर त्या जागी माती टाकण्यात आली. त्यामुळे बुधवारी दिवसभर या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.(Latest Marathi News)

बीआरटी मार्गावर मोहरीचे तेल वाहून नेणारा टँकर पलटी झाल्यावर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर सांडलेले तेल घरी नेले होते. स्थानिक लोक बादल्या, डबे आणि भांड्यांमध्ये रस्त्यावर सांडलेले तेल भरत होते.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT