In the afternoon firing on a sand supply businessman at wanwadi pune 
पुणे

पुण्यात पुन्हा थरार! वाळू पुरवठा व्यावसायिकावर वानवडीत भर दुपारी गोळीबार

सकाळवृत्तसेवा

पुणे : वाळू पुरवठा करणाऱ्या एका व्यावसायिकावर सोमवारी भर दुपारी पावणे एक वाजता अनोळखी व्यक्तींनी पिस्तुलातून गोळी झाडल्याची घटना घडली. ही घटना वानवडी परीसरात घडली. बांधकाम व्यावसायिकावर गोळी झाडुन त्यांचा खुन केल्याची घटना ताजी असतानाचा गोळीबाराची घटना घडली.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मयुर हांडे (वय 32, रा. वानवडी) असे या घटनेत जखमी झालेल्याचे नाव आहे. मयूर सोमवारी दुपारी हांडेवाड़ी रोडने वानवडी येथील श्रीराम चौकात आले. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. त्यामध्ये एक गोळी त्यांच्या गालाला चाटुन गेली. त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयूर यांच्यावर डॉक्टराकडुन उपचार सुरु असून तब्येत स्थिर आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपीनी तेथुन दुचाकीवर पळ काढला. हा हल्ला करण्यामागील कारण अद्याप समजले नसुन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. वानवडी पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, मागील सोमवारी पोलिस आयुक्तालय व बंडगार्डन पोलिस ठाण्यापासून जवळच स बांधकाम व्यावसायीक राजेश कनाबार (वय 63, रा. सोपानबाग, घोरपडी) यांच्यावर गोळी झाडुन त्यांचा खून करण्यात आला होता. जमीनीच्या वादातून ही घटना झाली होती, पोलिसांनी याप्रकरणी काही आरोपीना अटक केली होती. या घटनेस आठ दिवस झाले असतानाच पुन्हा एकदा शहरात गोळीबाराची घटना घडल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT