पुणे

बाणेरमध्ये अनधिकृत पत्राशेडवर पुन्हा कारवाई

शितल बर्गे

बालेवाडी : बाणेर येथील ताम्हाणे चौकात अतिक्रमण विभागाकडून महिनाभरातील ही दुसऱ्यांना कारवाई करून 20 हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या पत्र्याच्या शेड पाडण्यात आले आहेत. बाणेर येथील ताम्हाणे चौक या ठिकाणी (ता.11) जून रोजी पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून 65 हजार चौरस फूट क्षेत्रफळ असणाऱ्या पत्र्याच्या शेडवर कारवाई करण्यात आली होती. याच भागातील उर्वरित पत्र्याच्या शेडवर आज (ता. 30) एकूण 20 हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या पत्र्याच्या शेड वर जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली.

या परिसरात बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फर्निचर, चिकन, भाजी, फळं, हॉटेल अशी पत्र्याची मोठी दुकाने थाटण्यात आली होती. ही सर्व दुकाने अनधिकृत असल्यामुळे येथे वारंवार कारवाई करण्यात येणार असल्याने व्यवसायिकांची नुकसान होऊ शकते. यामुळे पुन्हा येथे शेड उभारून नयेत असे आवाहन महापालिका अधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आले.

कारवाई करताना सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन असून अनधिकृत कामे पाडण्याचे आदेश हरित लवाद अंतर्गत कोर्टाने दिले आहेत त्यानुसार नोटिसा देऊन पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केल्याचे बांधकाम विभागाचे अभियंता संग्राम पाटील यांनी सांगितले. बांधकाम विकास विभाग झोन 3 चे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे, उपअभियंता जयवंत पवार, गंगाप्रसाद दांडिमे,नवीन मेत्रे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E. Coli Bacteria: मुंबई रेल्वे स्थानकातील पाणी पिताय, जरा जपून! मध्य रेल्वेच्या ३ स्थानकात पाण्याच्या टाकीत आढळतोय 'हा' भयानक विषाणू

IND vs SL 1st Test: 'आता, सर्व तलवार चालवणार!'; रिषभ पंत लाईव्ह मॅचमध्ये रवींद्र जडेजाला असं का म्हणाला? Video Viral

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन बांगलादेशी ताब्यात; अनधिकृत वास्तव्य उघड, ढाब्यावर कुक-वेटर म्हणून काम, धक्कादायक सत्य समोर..

Marathi News Live Updates : रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती

Nag Panchami 2026: पृथ्वीवर नागकुळाची निर्मिती कशी झाली? जाणून घ्या नागदेवतेच्या जन्माची अद्भूत कथा..

SCROLL FOR NEXT