पुणे

मलकापूर कचरा डेपोवर रेनगन

CD

लाेगाे - सकाळ इम्पॅक्ट
....................


आगाशिवनगरच्या कचरा डेपोवर रेनगन


आग लागण्याच्या घटनेला आळा; पालिकेने केल्या उपाययोजना

मलकापूर, ता. २० : आगाशिवनगरच्या कचरा डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे निर्माण होणाऱ्या धुराच्या लोट व त्यातून नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत दै. ‘सकाळ’ने पालिकेला कधी जाग येणार अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर पालिकेला जाग आली असून, पालिकेने या ठिकाणी चोवीस तास डंपिंग यार्ड रेनगन बसवली आहे. त्यामुळे आग लागणार नाही, याची पालिकेने दक्षता घेतली आहे. या निर्णयाचे व दै. ‘सकाळ’चे अभिनंदन होत आहे.
आगाशिवनगर कचरा डेपोच्या ठिकाणी प्रमाणावर कचऱ्याचा ढीग साचला आहे. त्या कचऱ्याला अचानकपणे आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या कचरा डेपोतून निघणारे धुराचे लोट शास्त्रीनगर, लाहोटीनगरसह महामार्गाच्या बाजूला पसरतात. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रासाबरोबरच त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. आग विझविण्यासाठी मलकापूर पालिकेकडे अग्निशमन यंत्रणाही उपलब्ध नाही. तीन वर्षांत अनेकदा या कचरा डेपोला आग लागण्याचा प्रकार घडला आहे. १५ दिवसांपूर्वी सलग तीन दिवस हा कचरा जळत होता. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी या कचरा डेपोला आग लागली होती.
त्यानंतर दै. ‘सकाळ’ने पालिकेला जाग कधी येणार? अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. पालिकेने तातडीने आग प्रतिबंधक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी पावले उचलली. डंपिंग यार्डमध्ये रेनगन बसवली आहे. या रेनगनला सांडपाणी प्रक्रिया योजनेतून प्रक्रिया केलेल्या मलजलाचा पुरवठा केला आहे. त्यामुळे कचरा डेपोला लागणारी आग भविष्यात लवकर आटोक्यात येऊ शकते. ही रेनगन वर्तुळाकार ३६० अंश फिरू शकते. त्यामुळे तिच्या कक्षेत डंपिंग यार्डचा बहुतांश क्षेत्र येत असल्याने शेजारील शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त होत आहे.

.....
काेट
.............

काही दिवसांतच बायोमायनिंगची प्रक्रिया या कचऱ्यावर सुरू करत आहोत. त्यामुळे वर्षानुवर्षे साठलेले ढीग कमी होण्यास मदत होईल. सध्या ऊसतोडणीमुळे फड पेटवण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातील हवेने उडत आलेली एखादी पाचट कचरा डेपोत पडली, तरी आग लागत आहे. बहुतांश धूर हा उसाच्या फडाचा होता. आगीचे प्रकार वारंवार घडणार नाहीत. याची खबरदारी म्हणून डंपिंग यार्ड रेनगन बसविली असून, २४ तास पाण्याचे फवारे कचरा डेपोवर पडणार आहेत. त्यामुळे आग लागण्याचे प्रकार घडणार नाहीत.

- धनंजय थोरात,
आरोग्य विभागप्रमुख, मलकापूर पालिका.
.............................

A01314,
A01315

धनंजय थोरात


आगाशिवनगर ः कचरा डेपोवर आग लागू नये, यासाठी डंपिंग यार्ड रेनगन आले. (राजेंद्र ननावरे ः सकाळ छायाचित्रसेवा)


..............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT