पुणे

शिष्यवृत्ती परीक्षेत अगस्ती विद्यालयाची चमकदार कामगिरी

CD

शिष्यवृत्ती परीक्षेत अगस्ती विद्यालयाची कामगिरी
अकोले, ता. २० : अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ती विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात यंदाही यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी इयत्ता पाचवीतील २५, तर इयत्ता आठवीतील १७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
इयत्ता पाचवीतील अन्वी विजय उगले, गौरी बाळू तातळे, विनोद एकनाथ बांबळे, स्वरा सोमनाथ मेंगाळ, आरोही विजय बढे, स्वरा अविनाश साबळे, वेदांत राजू वायाळ, आदित्य रामचंद्र शितोळे, स्वरा काशिनाथ घनकुटे, ईश्‍वरी रेवणनाथ कानवडे, ओंकार लालू इरनक, संस्कार भानुदास कानवडे, जितेश्री अभिजित दराडे, कृष्णा सोमनाथ डहाळे, करण राजेंद्र जगताप, क्षितिज विष्णू नेहे, मनिष विशाल शेणकर, प्रज्ञेश प्रदीप सोनवणे, श्रेया शिवाजी मेंगाळ, आर्या गणेश जगदाळे आणि आलीना बबलू शेख यांनी यश संपादन केले.
आठवीच्या परीक्षेत तन्मय मनोहर भोजने, श्रेया महेश उगले, विहान दत्तात्रय आव्हाड, मैत्रीई नीलेश सहाणे, तन्वी बळीराम फरगडे, राजवर्धन ज्ञानदेव गवांदे, सर्वेश राजू पोखरकर, समृद्धी योगेश उगले, साक्षी भास्कर चौधरी, अनुष्का नितीन देशमुख, उजेफा मोसिन शेख, सोहम लालू इरनक, सिद्धी विकास मोरे, कार्तिकी भीमाशंकर हांडे, कृष्णा गणेश पोखरकर, साहिल राजेंद्र ठावरे आणि आदिती दिलीप होलगीर यांनी चमकदार कामगिरी केली.
विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जादा तासांचे नियोजन, नियमित सराव परीक्षा आणि तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आदी उपक्रम राबविल्यामुळे यश मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या यशाबद्दल संस्थेच्या सचिव शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी यांनी प्राचार्य मंगेश खांबेकर, उपमुख्याध्यापक तात्यासाहेब दौंड, पर्यवेक्षिका नंदा गोपाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे गिरीश नवले, सचिन शिंदे, सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJP-NCP Clash: भाजप नेते गणेश बिडकर यांचे सुनेत्रा पवारांना पत्र; अमोल बालवडकरांवर ‘अहंकारी, हेकेखोर’ आरोप, विकास निधी रोखल्याचा वाद पेटला

Pimpalvandi Protest: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनसागर उसळला; नराधमाला २० दिवसांत फाशीची जोरदार मागणी

Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

SCROLL FOR NEXT