Gayatri Vartak Sakal
पुणे

वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मुलांना विविध खेळांचे घडूदे ज्ञान - गायत्री वर्तक

‘लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा मैदानी किंवा घराबाहेरील उपक्रमांमध्ये सहभाग वाढविण्याची गरज आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा मैदानी किंवा घराबाहेरील उपक्रमांमध्ये सहभाग वाढविण्याची गरज आहे.

पुणे - ‘लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा मैदानी किंवा घराबाहेरील उपक्रमांमध्ये सहभाग वाढविण्याची गरज आहे. यासाठी पालकांनी आपल्या मुलांना वयाच्या ६ व्या वर्षापर्यंत त्यांना विविध खेळांची ओळख करून देणे आवश्यक असते. बऱ्याचदा पालकांसाठी हे आव्हानात्मक असेल तरी किमान मुलांना पोहणे, धावणे, सायकलिंग, जिमनॅस्टिक सारख्या खेळांत सहभागी होण्याचा आग्रह करावा. यामुळे सुरुवातीच्या आयुष्यात त्यांना खेळाचे तंत्र शिकण्यास आणि समजून घेण्यास मदत होते,’ असे मत क्रीडा मानसशास्त्रज्ञ गायत्री वर्तक- मडकेकर यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय टेबल टेनिस संघाला नुकतेच ३ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळाले आहे. या संघाच्या गायत्री क्रीडा मानसशास्त्रज्ञ असून देशातून प्रथमच मानसशास्त्रज्ञ प्रशिक्षकाला या स्पर्धेत संघासोबत पाठविण्यात आले होते. त्यानिमित्ताने वर्तक यांनी आई साधना वर्तक यांच्यासह 'सकाळ ' कार्यालयाला नुकतीच भेट दिली आणि संवाद साधला. गायत्री या मूळच्या पुण्याच्या असून त्यांनी बॅडमिंटनमध्ये ही देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर २०११-१२ पासून त्या ‘जानकी’ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून देशातील, परदेशातील खेळाडूंना मानसिक प्रशिक्षण देतात.

करिअर म्हणून खेळ शिकविण्याचा अट्टाहास नको :

पालकांना जे खेळ आवडतात, त्याच खेळाचे प्रशिक्षण ते आपल्या मुलांना देऊ इच्छितात. तसेच त्यात करिअरची संधी म्हणून पाहतात. परंतु मुलांना त्या खेळाची आवड आहे का, त्यांना त्या व्यतिरिक्त कोणते खेळ शिकायचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. खेळाला केवळ करिअर म्हणून न पाहता मुलांना त्यातून मिळणारा आनंद किंवा त्यांचा सर्वांगीण विकास याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. खेळात करिअर करताना उपलब्ध असलेली प्रशिक्षण सुविधा, प्रशिक्षक, पालकांचे प्रोत्साहन, कामाची नैतिकता, शिस्त कौशल्य आदींचे महत्त्व अधिक आहे. असेही गायत्री यांनी आवर्जून सांगितले.

क्रीडा मानसशास्त्र ही काळाची गरज :

क्रीडा मानसशास्त्र हा विषय खेळाडूसाठी आवश्यकच आहे. उत्तम कामगिरी करण्यासाठी शारीरिक बरोबर मानसिक प्रशिक्षण तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पालक व प्रशिक्षकांना ही गरज समजणे आवश्यक आहे. त्यामुळेच क्रीडा संस्थांमध्ये आता मानसिक प्रशिक्षण ही एक संस्कृती होऊ शकते. सुदैवाने स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे (साई) आता क्रीडा मानसशास्त्राची गरज ओळखून खेळाडूंच्या मानसिक प्रशिक्षणासाठी क्रीडा मानसशास्त्रज्ञांची नेमणूक केली जात आहे, गायत्री यांनी नमूद केले.

मानसिक समस्यांच्या प्रश्नांचे उत्तर योग सूत्रे आणि गितेत :

मानसिक आरोग्याशी निगडित अनेक प्रश्न सर्वसामान्यांना उद्भवतात. मानसशास्त्राचा उल्लेख हा योग आणि गीतामध्ये असून पतंजली योगसूत्रे, गीता तसेच संबंधित पुस्तकात ही मानसिक आरोग्याबाबत असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे सापडतात.

पालकांनी काय करावे :

- मुलांमध्ये खेळांना खेळासाठी प्रोत्साहित करणे

- कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण मुलांमध्ये रुजविणे

- भावनिक आणि सामाजिक शिक्षण देणे

- मुलांसोबत वेळ घालवावा त्यांच्या आवडी निवडी समजून घ्याव्यात

- त्यांच्यासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करू नये, यामुळे मुलांवर ताण येऊ शकतो

- खेळात करिअर करण्याची आपली जिद्द मुलांवर थोपवू नये

- त्यांच्या क्षमतेप्रमाणे खेळांची निवड करू द्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

SCROLL FOR NEXT