वासुदेव, पिंगळा, पोतराज ही मंडळी लोककला जपत मनोरंजनही करीत sakal
पुणे

शहरीकरण आणि सोशल मीडियाच्या जमान्यात लोककला लोप पावतेय का?

वासुदेव, पिंगळा, पोतराज ही मंडळी लोककला जपत मनोरंजनही करीत

अशोक बालगुडे

उंड्री : सोशल मीडियाच्या या जमान्यात सकाळच्या प्रहरी हरीनाम बोला, असा वासुदेवाचा गोड आवाज आता शहर-उपनगरालगतच्या गावातून हद्दपार होऊ लागला आहे. लोककलेचा वारसा जपत मनोरंजन करणारी कला भविष्यात पुस्तकातच वाचायला मिळणार का असा सवाल मोहन गोंडे (रा इस्कॉन मंदिराशेजारी, कात्रज, मूळ- मु.पो. जळोची, ता. बारामती, जि. पुणे) यांनी उपस्थित केला.

गोंडे म्हणाले की, भल्या पहाटे हातामध्ये कंदिल घेऊन पिंगळा यायचा भविष्य सांगायचा, पोतराज अंगावर आसूडाचे फटके मारून घ्यायचा आणि वासुदेव रंगीबेरंगी टोपी घालून भल्या सकाळी जागे करायचा असे प्रकार भविष्यात फक्त कपोलकल्पित गोष्टी वाटू लागतील, असे वाटले तर नवल वाटणार नाही.शहराबरोबर उपनगराचाही झपाट्याने विकास होत आहे, त्यामध्ये लगतची गावेसुद्धा मागे राहिली नाहीत. त्यामुळे पारंपरिक शेती, घरे, घरासमोर जनावरांसाठी गोठा, शेताकडे जाणारी पायवाट असा काही लूक आता पूर्णतः बदलले आहे. उंच उंच इमल्यांच्या भल्या मोठ्या सोसायट्या झाल्या असून, तेथील सुरक्षारक्षक सोसायटीत प्रवेश देत नाहीत. एखाद्या छोट्या सोसायटीत गेलो, तर बंद दरवाजामुळे आमचा आवाज तेथेपर्यंत पोहोचत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्यावर हातगाड्या, दुकानदारांकडून मिळणाऱ्या बिदागीवर पोटपूजा करावी लागत आहे. त्यामुळे पुढील पिढीकडे ही कला सोपवण्याऐवजी शिक्षण, नोकरीकडे त्यांचा कल असल्याचे बोलण्यातून जाणवले.

पूर्वी पहाटेच्या प्रसन्न वातावरण वासुदेव, पोतराज देवाची गाणी गात सर्वांना जागविण्याचे काम करत. पोतराज डोईवर देवीचा देव्हारा घेऊन गल्लोगल्ली फिरत. दारी आलेल्या या पोतराजाचे महिला भक्तिभावाने पूजन करून त्यांच्या पदरी शिधा घालत असे. धान्य, पीठाचा जोगवा देऊन देवीची ओटी भरत. पोतराज अंगावर आसूड ओडून भक्ताची मनोकामना पूर्ण होण्याचा आशिर्वाद देत असे. मिळालेल्या शिधामधून त्यांचाही उदरनिर्वाह होत असे. मात्र, आज त्यांना आपला उदरनिर्वाह करणे कठिण झाले आहे.

ग्रामीण संस्कृतीत लोककलावंतांना मोठा सन्मान होता आणि आजही आहे. आजच्या स्मार्ट फोनचा जमान्यात लोककला आणि कलावंत लोप पावताना दिसत आहे. पूर्वी पोतराज गावोगावी फिरत. काही भाकिते सांगत. लोक त्यावर विश्‍वास ठेवत. काळानुरूप परिस्थिती बदलली पोतराज आता संक्रात, दसरा, दिवाळीच्या सणाला क्वचित दिसू लागले आहेत. कला जोपासताना आर्थिक स्थैर्य नाही. शासन दरबारी दखल घेतली जात नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ येते. त्यामुळे पारंपरिक काला जोपासण्याऐवजी मुलांच्या शिक्षणाकडे ओढा आहे. त्यातून नोकरी मिळून किमान चार पौसे मिळतील व अंगावर आसूड मारून घेण्याची वेळ येणार नाही, असे पोतराजाकडून सांगितले जात आहे.कोरोना महामारीमुळे नोकरीही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुन्हा दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. मात्र, त्यातून कुटुंबाचा सांभाळ करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लोकांनी पारंपरिक लोककलावंतांकडे कलोपासक म्हणून पाहावे, अशी अपेक्षा वासुदेव मोहन गोंडे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT