Pune : नवलेपूल परिसरात प्रवाशांवर एजंटची दादागिरी
Pune : नवलेपूल परिसरात प्रवाशांवर एजंटची दादागिरी 
पुणे

Pune : नवलेपूल परिसरात प्रवाशांवर एजंटची दादागिरी

विठ्ठल तांबे

धायरी : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पूल आणि वडगाव पुलावर अनेक खाजगी बसेस प्रवाशांना घेण्यासाठी थांबतात. परंतु या परिसरातील अनेक बोगस एजंट बसेस मध्ये प्रवासी बसून देण्यासाठी पैसे उकळून महिलांशी उर्मट आणि दादागिरी करून दम देण्याच्या घटना अनेक वेळा घडत असल्याचे समोर येत आहे.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नवले पूल भागातील असल्याचे समोर आले आहे. त्या व्हिडिओमध्ये एजंट हा महिलांना दम देऊन पैसे उकळत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पुढे तो पोलिस माझे काही वाकडे करू शकत नाही, मी त्यांना हप्ता देतो असे उर्मटपणे सांगत असल्याचेही दिसते. बाहेर राज्यातील बसवाल्यांना देखील सज्जड दम या एजंकडून देण्यात येतो. महिला व मुलींना देखील दम देण्यात येतो. आशा प्रकारे जर कोणी राजरोसपणे दादागिरी करत असेल तर त्याच्याकडे पोलीस जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का किंवा तो बोलतो त्याप्रमाणे पोलिसांचे आणि या उर्मट एजंटचे अर्थपूर्ण हितसंबंध आहेत का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

"व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या व्यक्तीवर आणि परिसरात कुठल्याही प्रकारची एजंट दादागिरी करत असेल त्याच्यावर कारवाई करणार आहे."

- उदय शिंगाडे ,पोलीस निरीक्षक सिंहगड रस्ता वाहतूक विभाग

" अनेक वेळा बसेस प्रवाशी वाहतूक करत असतात परंतु या ठिकाणी अनेकवेळा बोगस एजंट प्रवाशांन सोबत दादागिरी आणि जास्त पैसे उकळत असता महिलांशी देखील असभ्य भाषा वापरतात. यामुळें परिसरात प्रवाशी असुरक्षित असल्याचे दिसून येते आहे.स्थानिक पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे".

- चिंतामण पुराणिक-नागरिक

"आम्ही मुंबईकडे जात असताना हा प्रकार घडला आहे. आम्ही बस चालकाशी प्रवाशी दराचे ठरवले होते परंतु तो कारण नसताना आमच्याकडून  पैसे उकळत होता. पुढे तो पोलिस माझे काही वाकडे करू शकत नाही, मी त्यांना हप्ता देतो असे उर्मटपणे सांगत असल्याचेही बोलला".

- मधुरा जगताप-प्रवासी (नाव बदलेले आहे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT