पुणे

VIDEO | पुण्यात हाणामारी, परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची आयोजकांसोबत जुंपली

ओमकार वाबळे

पुण्यातील रामटेकडी येथे CTET ची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना 5 ते 10 मिनिट उशीर झाला. विद्यार्थ्यांनी तेथील उपस्थित आयोजकांना आता सोडण्यास विनंती केली. मात्र प्रशासनाने दाद न दिल्याने विद्यार्थ्यांनी गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला. अशातच प्रशासनाने अडवल्यानंतर प्रकरणाचं हाणामारीत रुपांतर झालं.

पुण्यातील हडपसर रामटेकडी येथे एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि आयोजकात हाणामारीचा प्रकार घडलाय, परीक्षा केंद्रावर उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांत आणि आययोजकात बाचाबाची झाल्यानंतर थेट हाणामारी झाली.

आतमध्ये गेलेल्या महिला विद्यार्थ्यांना कोंडून ठेवण्यात आलं आहे. काही परीक्षा केंद्र कर्मचारी वर्गाकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते.

मात्र जमावबंदी असताना व 50 टक्के उपस्थिती अपेक्षित होती. अशा वेळी दीड हजार विद्यार्थ्यांना एकत्र का बोलवण्यात आले. याविषयी स्थानिक नागरिक सतीश कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कोरोनाच्या काळात तब्बल दीड हराजांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जमून परीक्षा घेत कोरोनाचे नियम मोडणाऱ्या परीक्षा सेंटरवरच कारवाईची करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

खासगी परीक्षा केंद्र चालक व्यवस्थापन प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करीत आहे. विद्यार्थ्यांना पोलिसांनी दबावाखाली घेऊन माफीनामा लिहून घेण्यात येणार असल्याचा आरोप पालक रवींद्र ढवळे यांनी केला. विद्यार्थ्यांना कायद्याची भीती दाखवली जात आहे, असं ते म्हणाले.

वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून विद्यार्थी व व्यवस्थापनासोबत बोलणी सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT