NCP Agitation Sakal
पुणे

राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मूलभूत समस्यांपासून वंचित असलेल्या नागरिकांकरिता आंदोलन

राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रभाग 27 मधील कासेवाडी, हरकानगर, लोहियानगर या भागातील मूलभूत समस्यांपासून वंचित असलेल्या नागरिकांकरिता आंदोलन करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रभाग 27 मधील कासेवाडी, हरकानगर, लोहियानगर या भागातील मूलभूत समस्यांपासून वंचित असलेल्या नागरिकांकरिता आंदोलन करण्यात आले.

कॅन्टोन्मेंट - राष्ट्रवादी पक्षाच्या (NCP) वतीने प्रभाग 27 मधील कासेवाडी, हरकानगर, लोहियानगर या भागातील मूलभूत समस्यांपासून (Basic Problems) वंचित असलेल्या नागरिकांकरिता आंदोलन (Agitation) करण्यात आले.

यामध्ये दूषित पाणी, पिण्याच्या पाण्याची समस्या, वीज, ड्रेनेज लाईन, अस्वच्छता, रस्त्यावरील खड्डे असे आदी समस्यांविषयी निवेदन भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे मनपा सह. आयुक्त गणेश सोनुने यांना देण्यात आले.

यावेळी पक्षाचे कँटोन्मेंट मतदार संघाचे निरीक्षक रवींद्र माळवदकर, जुबेर बाबू शेख, दत्ता जाधव, विक्रम मोरे, नरेश जाधव, शांतीलाल मिसाळ, युसुफ शेख, किरण जगताप, नरेश पगडाल्लू, फिरोज तांबोळी, हरीश लडकत, इस्तीयाक बागवान, राहुल तांबे, पोपटराव गायकवाड,संजय गायकवाड निकिता जाधव, योगिता लडकत, दिलशाद शेख, शरीन शेख आदी महिला कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माळवदकर म्हणाले की, हाकेच्या अंतरावर क्षेत्रीय कार्यालय असताना देखील नागरिकांच्या समस्यांची दखल घेतली जात नाही. भाजपची सत्ता असताना देखील अमानुषपणे नको ती बिले पास करून लोकांना त्रास देण्याचे काम याठीकणी केले जात आहे. पुढील काळात नगरसेवकांनी या समस्येचे निवारण केले नाही तर पुढच्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माळवदकर यांनी दिला.

यावेळी जुबेर बाबू शेख म्हणाले की,क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आळशीपणा व निष्काळजीपणाला कंटाळून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. यामध्ये लोकांच्या घरात पाणी, दारात पाणी, असा अनेक समस्या आज भेडसावत आहे. आम्ही पक्षाच्या वतीने गल्लीबोळात ट्यूबलाईट बसविले होते मात्र ते ट्यूबलाइट देखील नगरसेवकांना हाताशी धरून अधिकाऱ्यांनी ते बंद केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT