agitation Of NCP in Pune Pimpri for Sharad Pawar 
पुणे

video : शरद पवारांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर; पुणे पिंपरीत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य शिखर सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात आज राष्ट्रवादीकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. शांततेत आंदोलन सुरु असताना कार्यकर्त्यांनी अचानक रास्ता रोको केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. दरम्यान, संतप्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत भाजप सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

पिंपरीत राष्ट्रवादीने केले रास्ता रोको आंदोलन
पिंपरी : शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन सुरु आहे. पिंपरी चौकात रस्ता रोको केला आहे. रस्त्याच्या मध्येच कार्यकर्त्यांनी ठाण मांडले असून भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

SCROLL FOR NEXT