Agitation in the state for demands recruitment of teachers, increase in honorarium of education workers:  
पुणे

शिक्षक भरती : राज्यात होणार 'घर बैठे डिग्री जलाओ आंदोलन'

मिनाक्षी गुरव

पुणे : शिक्षक भरती बाबत सरकारच्या दुर्लक्ष  आणि अन्यायकारक धोरणाचा विरोध करण्यासाठी डि.टी.एड,बी.एड स्टूडंट असोसिएशनच्या वतीने येत्या शुक्रवारी (ता. १०) सकाळी दहा वाजेपासून राज्यव्यापी "घर बैठे डिग्री जलाओ आंदोलन" करण्यात येणार असल्याची माहिती डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनच्या पुणे जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

या आंदोलनात डी.एड, बी.एड.धारक आणि शिक्षण सेवक घरी बसून  सहभागी होणार असून पदवी ( डिग्री )च्या प्रतिकात्मक प्रती जाळून ते व्हिडिओ, छायाचित्र सोशल मिडियाद्वारे शिक्षण मंत्री, आयुक्त यांच्यापर्यंत पोचविण्यात येणार आहे. शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करून आमच्या मागण्या पूर्ण करून न्याय द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. 

या मागण्यांसाठी होतय आंदोलन :
- राज्यातील रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी देऊन जागा भराव्यात.
- शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ करुन २४,००० रूपये करावे
- ५० टक्के मागासवर्गीय पदभरतीमधील कपात रद्द करावी. 
- बी. एम. सी. मधील अपात्र ठरलेल्या उमेदवारांना न्याय देण्यात यावा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत अनेक उमेदवार आहेत. मात्र राज्य सरकारने शिक्षक भरती प्रक्रियेला दिलेली स्थगिती उठविलेली नाही. तसेच राज्यातील हजारो शिक्षण सेवक गेल्या काही वर्षांपासून अत्यंत अल्पशा मानधनावर काम करत आहेत. त्याचे मानधन वाढवून मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, घरात राहूनच प्रतिकात्मक स्वरूपात पदवी जाळून हे आंदोलन करण्यात येणार आहे."
- पूनम पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष, डि.टी.एड,बी.एड स्टूडंट असोसिएशन
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT