Agitations against the President of All India Film Corporation Appointments are illegal pune Sakal
पुणे

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांविरोधात आंदोलन!

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर आहेत, असा दावा करत महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या समर्थकांनी शुक्रवारी महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. चित्रपट महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. तर, त्यांच्या जागी सुशांत शेलार यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शेलार यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने रिक्त झालेल्या प्रमुख कार्यवाहपदी रणजित जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या बैठकीवर मेघराज राजेभोसले यांनी आक्षेप घेतला आहे.

‘‘कार्यकारिणीची मुदत संपुष्टात आली असून सध्या आम्ही सगळेच काळजीवाहू म्हणून काम करीत आहोत. या कार्यकारिणीला कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने आपण या बैठकीला परवानगी दिली नव्हती’’, असे राजेभोसले यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर नव्या पदाधिकाऱ्यांपैकी एक सदस्य महामंडळाच्या पुणे कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी येणार असल्याचे समजताच राजेभोसले यांच्या समर्थकांनी आंदोलन करून नव्या कार्यकारिणीचा निषेध केला. यावेळी ‘मेघराज भैय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘सुशांत शेलार हाय हाय’, ‘नव्या कार्यकारिणीचा निषेध असो’, आदी घोषणा देण्यात आल्या. महामंडळाची निवडणुक घ्यावी, तोवर महामंडळावर प्रशासक नेमावा, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्वरित हटवावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला, मुंबईसह ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Sharad Pawar: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची शरद पवारांनी घेतली दखल; ‘सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा’

करकायदा : ‘आयटीसी’बाबत सुधारणा...

आजचे राशिभविष्य - ०५ ऑक्टोबर २०२६

शेअर बाजार : रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज (गुरुवारचा बंद भाव : रु. ८४१)

SCROLL FOR NEXT