Green-Township 
पुणे

हरित टाउनशिपसाठी करारावर स्वाक्षऱ्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी हरित टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. यासाठी स्वित्झर्लंड येथील २००० वॅट स्मार्ट सिटी असोसिएशनसोबत गुरुवारी प्राधिकरणाने सामंजस्य करार केला. पीएमआरडीए आणि २००० वॅट स्मार्ट सिटी संघटना मिळून एका स्वतंत्र कंपनीची स्थापना करणार असून, त्या माध्यमातून पीएमआरडीएच्या हद्दीत कृषी, सेवा उद्योग समूह, हेल्थकेअर अशा विभागांमध्ये हरित टाऊनशिप उभारणार आहे. एका टाऊनशिपसाठी सुमारे १२५ एकर जागेची आवश्‍यकता असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांनी या वेळी दिली. स्वित्झर्लंडचे कौन्सिल जनरल ओथमार हारदेगार, २००० वॅट स्मार्ट सिटी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव भागवत, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर, प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी आदी मान्यवर उपस्थित होते. हारदेगार म्हणाले, ‘‘२००० वॅट स्मार्ट सिटी असोसिएशनअंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने भारताने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम अन् भारताचा मालिका विजय! जसप्रीत, नितीशचे खतरनाक यॉर्कर Video

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

SCROLL FOR NEXT