पुणे

कृषी महाविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कारवाईला वेग कागदपत्रे, बिल व रजिस्टर जप्त करण्यासाठी पोलिसांचा पुढाकार

CD

कृषी महाविद्यालयातील आर्थिक
गैरव्यवहारप्रकरणी कारवाईला वेग

कागदपत्रे, बिले व रजिस्टर जप्त करण्यासाठी पोलिसांचा पुढाकार

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर तपासाला वेग आला आहे. प्रकरणाशी संबंधित विविध बिले, नोंदी आणि रजिस्टर जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाला आता निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोपींकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
कृषी महाविद्यालयातील विविध कामांच्या देयकांमध्ये अनियमितता, ११५ बनावट देयकांची निर्मिती, एकाच कामासाठी दुबार देयके काढणे, तसेच १३८ महत्त्वाच्या फाईल्स व मूळ कागदपत्रे गहाळ झाल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.

या प्रकरणात विद्यापीठाचे विद्यमान संशोधन संचालक तथा कृषी महाविद्यालयाचे तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, सहाय्यक कुलसचिव हंसराज राठोड, वरिष्ठ लिपिक तथा भांडारपाल सौरभ मोरे, कृषी सहायक तथा भांडारपाल विलास गुल्हाने, भांडारपाल पंकज पाल (मृत), मदन लांजेवार (मृत) तसेच खासगी कंत्राटदार संतोष म्हातारमारे यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

या प्रकरणात अद्याप कुठल्याही आरोपीला अटक झालेली नाही. मात्र, पोलिसांनी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याने तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. देयकांची पडताळणी, संबंधित नोंदी आणि उपलब्ध कागदपत्रांची छाननी करून गैरव्यवहारातील नेमकी रक्कम तसेच जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, १८ दुबार देयके आणि ७४ फाईल्स गायब असल्याचे समोर आले आहे. चौकशी पुढे जात असताना हा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात जप्त होणाऱ्या कागदपत्रांमधून या प्रकरणातील आर्थिक व्यवहाराचे आणखी धक्कादायक तपशील समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Volkswagen Layoffs 2026: Volkswagen मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात; आणखी ५० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, कारचे मॉडेलही निम्मे होणार; नेमकं प्रकरण काय?

Navi Mumbai: मुदतबाह्य सलाईनमुळे रुग्णाचा मृत्यू, कुटुंबीयांना १० लाखांची मदत; दोन परिचारिका निलंबित

अखेर कमळी अंतिम वार करणार! रितेश सरपोतदारचं सत्य उघड होणार? ‘कमळी’ मालिकेत उत्कंठावर्धक वळण

Marathi News Live Updates : बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Krishna Janmashtami 2026: आजची गोकुळाष्टमी ठरणार खास! 15 वर्षांनंतर जुळून आलाय दुर्मिळ योग; 'या' राशींसाठी ठरणार लकी

SCROLL FOR NEXT