rock
rock 
पुणे

पेरणी केलेल्या शेतात राहिला फक्त खडक! 

विजय मोरे

उंडवडी (पुणे) : कऱ्हा नदीला गुरुवारी (ता. 26) आलेल्या पुराच्या पाण्याने अंजनगाव (ता. बारामती) येथील शेतकरी अमित आनंदराव परकाळे यांच्या अर्धा एकर जमिनीतील माती वाहून गेली असून, फक्त खडक उरला आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी या शेतात करडईची पेरणी केली होती. आता मात्र फक्त तिथे फक्त खडक राहिला आहे.

अमित परकाळे यांनी अंजनगाव येथे कऱ्हा नदीलगच्या अर्धा एकर जमिनीत आठ दिवसांपूर्वी करडईची पेरणी केली होती. गुरुवारी सकाळी नदीला पूर आला आणि या जमिनीतील चार ते पाच फूट खोलीपर्यंतची माती आणि पाइपलाइन पाण्यात वाहून गेली. एक दिवसातच होत्याचे नव्हते झाले. नदीच्या पुराचे पाणी दुसऱ्या दिवशी ओसरल्यानंतर परकाळे कुटुंबीय शेतात गेले. त्या वेळी त्यांना परिस्थिती पाहून धक्काच बसला. अक्षरशः अर्धा एकर जमिनीत मातीच उरली नाही. संपूर्ण माती वाहून गेल्यानंतर जमिनीतील खडक उघडला पडला आहे. 

या घटनेची माहिती प्रशासनाला कळविल्यानंतर गावकामगार तलाठी बाळासाहेब वणवे व कृषी सहायक नवनाथ गोरे यांनी पंचनामा केला. यामध्ये शेतातील माती, पाइपलाइन व करडईचे पीक, असे मिळवून 1 लाख 73 हजार रुपये नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. 

दरम्यान, नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी परकाळे यांच्यासह शेतकऱ्यांकडून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT