पुणे

आकृतिबंधात होणार बदल

CD

आकृतिबंधात होणार अंतर्गत बदल

क्षेत्रफळ, पेसा क्षेत्र, भौगोलिक गरजांनुसार पदांची निर्मिती

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : कृषी विभागाच्या आकृतिबंधाबाबत विविध स्तरांतून तक्रारी आल्यानंतर सहायक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी संवर्गातील पदांच्या संख्येत अंतर्गत बदल करण्यात येणार आहेत. ही पदे खातेदारांच्या संख्येऐवजी क्षेत्रफळावर आधारित असतील. तसेच पेसा क्षेत्र आणि भौगोलिक गरजा लक्षात घेऊन पदांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
यासाठी वित्त विभागाची मान्यता घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तसेच उच्चाधिकार समितीचीही मान्यता घेण्यात येणार आहे. याबाबत कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्टीकरण दिल्यानंतर इतिवृत्तास मान्यता देण्यात आली.
मागील मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या आकृतिबंधाला मान्यता देण्यात आली होती. यामध्ये सहायक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी संवर्गातील पदे कमी करण्यात आली होती. प्रत्यक्षात शेतीशी संबंधित पदेच कमी केल्याने कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याने लोकप्रतिनिधी आणि संघटनांनी त्याला विरोध केला होता.
याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारणा केली असता, कृषी विभागाने ही पदे वाढविण्यात येतील. त्यासाठी उच्चाधिकार समिती आणि वित्त विभागाची मान्यता घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
याबाबत राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. क्षेत्रीय स्तरावर १५०० खातेदारांमागे एक सहायक कृषी अधिकारी याप्रमाणे ११ हजार ४४५ पदांना मान्यता देण्यात आली आहे. याचा मोठा परिणाम विदर्भातील शेतीवर होणार आहे. तसेच उपकृषी अधिकाऱ्यांची पदे मुख्यालयांमध्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष काम करणारी यंत्रणा कमी करून त्यांना कार्यालयीन काम देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारणा केली.
त्यानंतर भौगोलिक परिस्थिती आणि वाढत्या योजनांच्या तुलनेत सद्यःस्थितीत कार्यरत मनुष्यबळावर प्रचंड ताण येत असल्यामुळे क्षेत्रीय कामकाजाच्या नियंत्रणासाठी सहायक कृषी अधिकाऱ्यांची १३०६ आणि उपकृषी अधिकाऱ्यांची ६८२ पदे वाढविण्यात आली आहेत. १५०० खातेदारांमागे एक सहायक कृषी अधिकारी तसेच सात सहायक कृषी अधिकाऱ्यांमागे एक उपकृषी अधिकारी मंजूर करण्यात आला आहे. २००९ च्या आकृतिबंधात सहायक कृषी अधिकारी संवर्गाची १० हजार ६२० पदे होती. ती आता १२ हजार ९०५ करण्यात आली आहेत. तसेच उपकृषी अधिकारी संवर्गाची २७५२ पदे होती, ती आता ३४३४ करण्यात आली आहेत, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासकीय गरज, भौगोलिक परिस्थिती, पेसा क्षेत्र तसेच वाढत्या योजनांचा आवाका लक्षात घेता सहायक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी पदे वाढविणे गरजेचे असून, त्यानुसार अंतर्गत बदल करून योग्य निर्णय घेऊ, असे स्पष्टीकरण दिले.

कोट
लोकप्रतिनिधी, संघटनांच्या मागण्यांची दखल घेऊन आकृतिबंधात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलांना उच्चाधिकार समितीची मान्यता घ्यावी लागेल. ती प्रक्रिया पूर्ण करू. सहायक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी ही पदे क्षेत्रफळावर आधारित असतील.
- दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Prices Soar : आळेफाटा उपबाजारात कांद्याला किलोला ४२ रुपये उच्चांकी दर; आवक वाढली तरी भावात उसळी, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

SCROLL FOR NEXT