पुणे

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट प्रथम पुरस्कार

CD

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट पुरस्कार

एक लाख रुपयांचे पारितोषिक; शैक्षणिक, संशोधनविषयक कामगिरीचा गौरव

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ५८ व्या स्थापना दिनानिमित्त कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ट घटक महाविद्यालय पुरस्कार २०२६’ अंतर्गत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासोबत एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधनविषयक कामगिरीचा गौरव करण्यात आला.

विद्यापीठात आयोजित स्थापनादिन सोहळ्यात कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख आणि कृषी वैज्ञानिक भरती मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. काळबांडे यांनी स्वीकारला. यावेळी कृषी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. बी. उंडिरवाडे, कृषी अभियांत्रिकी विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली.

--- फोटो B27776 ---
अकोला : डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून प्रथम पुरस्कार स्वीकारताना महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC बाबत मोठी अपडेट! 11 हजार जागा वाढणार... वयोमर्यादेतही वाढ? व्ही. राधा समितीच्या अहवालात काय?

Vishal Patil Sugarcane Price Meeting : ऊसदराच्या बैठकीत खासदार विशाल पाटील भडकले; स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी खडाजंगी, सभागृहात गोंधळ

Diwali 2026: नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि अभ्यंगस्नानाची वेळ...

Latest Marathi News Live Update : सतेज पाटील यांना उद्धव ठाकरे यांचा फोन

IPL 2027 Trade News: हार्दिक पांड्या नेमका कोणत्या संघात जाणार? वाऱ्यावरच्या चर्चांनंतर BCCI ची मोठी घोषणा, लवकरच चित्र होईल स्पष्ट

SCROLL FOR NEXT