पुणे

ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान

CD

‘ठिबक सिंचना’साठी
४५ ते ५५ टक्के अनुदान

‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २०६ कोटींचा निधी मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षातील ‘प्रति थेंब अधिक पीक’ (सूक्ष्म सिंचन) घटकासाठी दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी ५० लाख १ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी असून, केंद्र व राज्य शासनाचा निधी अनुक्रमे ६०:४० या प्रमाणात आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.
राज्यात २०१५-१६ पासून ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. केंद्र सरकारने २० नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे नामांतर करून तिला ‘पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना’ असे नाव दिले आहे. सूक्ष्म सिंचन योजनेसाठी ४७७ कोटी रुपयांच्या कार्यक्रमास यापूर्वी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात २०८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी ५० लाख १ हजार रुपयांचा निधी कृषी आयुक्तांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनेतील लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येते. तसेच अनुदानाची रक्कम आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते.
या योजनेअंतर्गत ठिबक सिंचन संचाच्या खर्चावर शेतकऱ्यांना ४५ ते ५५ टक्के अनुदान दिले जाते. अधिकाधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणणे, अचूक पाणी व्यवस्थापनाद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पीक उत्पादकता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा प्रसार करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी थेट पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचत असल्याने ३० ते ८० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते. तसेच जमिनीत वाफसा टिकून राहण्यास मदत होत असल्याने पिकांची वाढ अधिक जोमदार व सातत्यपूर्ण होते.

‘जमीन आरोग्य’
कार्यक्रमासाठी ५.१६ कोटी
२०२६-२७ मध्ये पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन आरोग्य व सुपिकता कार्यक्रमासाठी दुसऱ्या हप्त्यापोटी ५ कोटी १६ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासही शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) योजनेसाठी ११४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT