पुणे

कृपया यापुर्वीची बातमी न घेता ही सुधारित घ्यावी.... आकृतीबंध रद्द करून तज्ज्ञ समितीमार्फत नव्याने तयार करा ः कृषी सेवा महासंघातील संघटनांची अपेक्षा

CD

‘कृषी’चा आकृतिबंध तज्ज्ञ समितीमार्फत नव्याने तयार करा
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : कृषी विभागाच्या प्रस्तावित आकृतिबंधाबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काही पदे व संवर्गांच्या वेतनश्रेणीत करण्यात आलेल्या बदलांबाबत पुनर्विचार व्हावा, अशा स्वरूपाची अपेक्षा कृषी सेवा महासंघात सहभागी काही संघटनांकडून होत आहे.
आस्थापना व लिपिक संवर्गातील काही पदांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात आली असताना, शेतकऱ्यांशी थेट संपर्कात राहून क्षेत्रीय काम करणाऱ्या तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनस्तर, पदोन्नतीच्या संधी आणि सेवाभवितव्याचा पुरेसा विचार झालेला नसल्याचे मत मांडले जात आहे. गेल्या १५-२० वर्षांत कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेवरील कामाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. पीक संरक्षण, कृषी निविष्ठांचे गुणनियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, विविध योजनांची अंमलबजावणी, डिजिटल कृषी तसेच कृषी उत्पादन व निर्यात वाढीसाठी ही यंत्रणा कार्यरत आहे.
मात्र, अनेक तांत्रिक संवर्गांमध्ये १५-२० वर्षांपासून पदोन्नतीची संधी नाही. तालुका स्तरावरील कार्यालय प्रमुखाचे पद वर्ग-१ दर्जाचे न करणे, एस-१९ वेतनस्तराची प्रत्यक्ष अंमलबजावणी न होणे, वर्ग-२ स्तरावरील संवर्गांमध्ये विसंगती आणि वाढत्या कार्यभाराचा पदरचना व वेतनश्रेणीत पुरेसा विचार न होणे, या बाबींवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रस्तावित आकृतिबंध स्थगित करून कृषी, प्रशासन आणि क्षेत्रीय कामाचा अनुभव असलेल्या तज्ज्ञांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली स्वतंत्र समिती स्थापन करावी. पदनिहाय वेतनस्तर, पदोन्नती, कार्यभार, शेतकरी सेवा, कार्यालयीन गरज आणि शासनावरील आर्थिक परिणामांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून पारदर्शक व शेतकरी-केंद्रित नवीन आकृतिबंध तयार व्हावा, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT