Pune metro Work sakal
पुणे

Road Issue : कृषी महाविद्यालय पर्यायी रस्त्याबाबत संभ्रम; बैठकीला मिळेना मुहूर्त

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न काही प्रमाणात कमी झाल्याने कृषी महाविद्यालयातील पर्यायी रस्ता सुरू करावा किंवा नाही?, याबाबत प्रशासनापुढे प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न काही प्रमाणात कमी झाल्याने कृषी महाविद्यालयातील पर्यायी रस्ता सुरू करावा किंवा नाही?, याबाबत प्रशासनापुढे प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका, पीएमआरडीए, पोलिसांच्या वाहतूक शाखेची बैठक होणार असून, त्यामध्ये याबाबत ठोस निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, या बैठकीला मुहूर्त मिळालेला नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंद ऋषीजी महाराज चौकासह गणेशखिंड रस्त्यावर बहुमजली उड्डाण पूल, मेट्रो प्रकल्प व रस्ता रुंदीकरणामुळे चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी पर्यायी रस्त्याबाबत महापालिका, कृषी महाविद्यालय व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

त्यानुसार, कृषी महाविद्यालयातील रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. साखर संकुल येथील महामेट्रोच्या प्रवेशद्वारापासून कृषी महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत अंडी उबवणी केंद्राजवळील लोहमार्ग पुलाखालून हा पर्यायी रस्ता पुढे जात होता. त्यानुसार, दोन महिन्यांत ‘पीएमआरडीए’ने रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून हा रस्ता खुला केला जाणार होता. मात्र, खुला केला नाही.

वाहतुकीत बदल, रस्ता रुंदीकरण

आनंद ऋषीजी महाराज चौकासह गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत बदल केला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्याचबरोबर बोपोडी व खडकीदरम्यानचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, मुंबई-पुणे महामार्गावरील बोपोडी ते संविधान चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने दोन्ही रस्ते महाराष्ट्र दिनापासून वाहतुकीसाठी खुले केले आहेत.

तसेच खडकी रेल्वे स्थानकाजवळील चिखलवाडी परिसरातील अतिक्रमणे काढून महापालिकेने तेथेही रस्ता रुंदीकरण केले आहे. परिणामी वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कृषी महाविद्यालयातील पर्यायी रस्ता तयार झाला आहे. मात्र गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे या रस्त्याबाबत कृषी महाविद्यालय, वाहतूक पोलिस, महापालिकेशी चर्चा करणार आहोत. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

- राहुल महिवाल, आयुक्त, पीएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT