पुणे

शेती व शेतकरी अडचणीत

CD

युद्धामुळे निर्यात अडचणीत; शेतकरी आर्थिक संकटात
पुरामुळे ऊस उत्पादनात घट; फळ निर्यातीला फटका, दुधालाही योग्य दर नाही
विवेक राऊत : सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. ७ : शेतकऱ्यांची सध्या चारही बाजूंनी ससेहोलपट सुरू आहे. यंदा पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पीक असलेल्या उसाचे एकरी उत्पादन पुरामुळे सुमारे ५० टक्क्यांनी घटले आहे. अनेक साखर कारखान्यांकडून अजूनही उसाची एफआरपी देण्यात आलेली नाही. त्यातच आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे निर्यातक्षम शेतीमाल अडकून पडल्याने शेती व शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
महाराष्ट्र वगळता आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांत म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर सुमारे १०० रुपये दर मिळत आहे. मात्र, महाराष्ट्रात बनावट किंवा रासायनिक दुधाचा सुळसुळाट वाढला आहे. दुग्धजन्य पदार्थ तयार करताना सोयाबीनचा वापर केला जात आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना योग्य दर मिळत नाही. राज्यात म्हशीचे दूध सध्या ५० ते ७० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
दरम्यान, सरकी पेंड, हरभरा भुसा, गहू भुसा, हरभरा चुनी यांसारख्या पशुखाद्यांच्या किमती वाढल्याने दूध उत्पादनाचा खर्चही वाढला आहे. परिणामी दुग्ध व्यवसायही अडचणीत सापडला आहे.
इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक पातळीवर इंधन पुरवठ्याचे संकट निर्माण झाले असून, शेअर बाजारही ढासळला आहे. या परिस्थितीचा परिणाम शेतीमालाच्या बाजारावरही झाला आहे. कलिंगडाला काही दिवसांपूर्वी २० ते २५ रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. मात्र सध्या व्यापारी १० रुपयांनाही खरेदी करण्यास तयार नसल्याची स्थिती आहे. उन्हाळी हंगामात चांगला दर मिळेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड आणि खरबुजाची लागवड केली होती. मात्र, आता कमी दरामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. केळी पिकाचीही अशीच अवस्था झाली आहे.
---
कोट
देशाचा कणा शेतकरी असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणताही राजकीय पक्ष ठाम भूमिका घेताना दिसत नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची शंभर टक्के अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
- भीमराव फुले, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
---
कोट
१७-१८ रुपये दराने विक्री होणारी केळी युद्धामुळे आता ७-८ रुपये किलोने विकावी लागत आहे. निर्यातक्षम केळीचा दर २२ ते २४ रुपयांवरून ९ ते १० रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
- डॉ. एम. पी. मोरे, केळी उत्पादक, नातेपुते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Accident : काळाचा घाला! उमराणे उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात; सिडकोतील एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

Kalamb News : इस्त्रायल-इराण युद्धाचा धसका, पेट्रोल दरवाढीची अफवा; कळंबमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा

Kolhapur Market: बंद गाळे बनले कचरा कोंडाळा; अवैध धंद्यांचे ठिकाण, मोठी संपत्ती असतानाही उत्पन्न वाढीसाठी वापर नाहीच

Nashik Bribery Case : जीएसटी चौकशीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मागितली 'कोटी'ची लाच; दोन वरिष्ठ अधिकारी जाळ्यात

SCROLL FOR NEXT