पुणे

शेतकरी, उत्पादक कंपन्यांसाठी विशेष मोहीम

CD

मंचर, ता. २३ : ‘‘कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या कर्जाचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या
, सहकारी संस्था, बचत गट आणि कृषी उद्योजकांनी तालुका कृषी अधिकारी, आत्मा कार्यालय, कृषी विभाग किंवा जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन घोडेगाव येथील तालुका कृषी कार्यालयातील सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक धोंडीभाऊ पाबळे यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत ही मोहीम राबविण्यात येत असून, शेतमालाच्या काढणीनंतर साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक आणि विपणनासाठी आवश्यक आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यास प्रोत्साहन देणे हा योजनेचा उद्देश आहे.


दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज
कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलत तसेच पतहमी (क्रेडिट गॅरंटी) सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे कृषी क्षेत्रातील उद्योजकांना कमी व्याजदरात प्रकल्प उभारणीची संधी मिळत आहे.

यासाठी आर्थिक सहाय्य
गोदामे, शीतगृहे, पॅकगृहे,
प्रतवारी व वर्गीकरण केंद्रे
प्राथमिक प्रक्रिया केंद्रे
कृषी वाहतूक सुविधा
जैविक निविष्ठा निर्मिती केंद्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhuloba Ramling Devasthan : कोल्हापुरातील हातकणंगले धुळोबा रामलिंग देवस्थानाकडे जाणारा रस्ता रात्रीतून जेसीबीने उकरला; भाविकांमध्ये संताप

'हट ना बे...'करीना कपूरने प्रेग्नेंसीच्या चर्चेवर दिलं उत्तर; म्हणाली, ‘तुम लोग तो...’ Viral Video

Marathi News Live Updates : संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूचा दिल्ली पोलीसांकडून सखोल तपास सुरू

New Marathi Books : मराठी वाङ्‍मयाचा वारसा आणि वर्तमान ; दुर्मीळ ग्रंथ, ध्यानमार्गदर्शन व स्त्रीमनाच्या कवितांचा नवा पुस्तकमेळा

Beyond the Hype AI : एआयच्या युगात भारताची भूमिका दुय्यम राहणार? नवोन्मेष आणि संशोधनाची गरज सांगणारे पुस्तक चर्चेत

SCROLL FOR NEXT