crop loan sakal
पुणे

कृषी विभागामार्फत प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजुरी पंधरवडा

इच्छुक व्यक्ती व गटांनी, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ साहाय्यासाठी अर्ज सादर करावेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कृषी विभागामार्फत (Agriculture Department) ३ ते १८ जानेवारीदरम्यान अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजुरी (Bank Loan Approval) पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने इच्छुक व्यक्ती व गटांनी, शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ साहाय्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या (पीएमएफएमई) माध्यमातून ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ओडीओपी) या आधारावर राबवली जाते. वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के कमाल १० लाख रुपयांपर्यंत अनुदान आहे. गट लाभार्थी जसे स्वयं:सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संस्था व उत्पादक सहकारी संस्था यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणूक यासाठी प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान आहे. याशिवाय इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बीज भांडवल, मार्केटिंग व ब्रॅन्डींग आणि प्रशिक्षण या घटकांसाठीही लाभ देता येणार आहे.

२०२१-२२ या वर्षात पुणे जिल्ह्यासाठी योजनेंतर्गत भांडवली गुंतवणुकीसाठी ३२५ वैयक्तिक उद्योगांना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. तसेच, १५ स्वयंसहाय्यता गट, सहा शेतकरी उत्पादक कंपन्या आणि दोन सहकारी संस्थांनाही अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. इच्छुकांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी www.pmfme.mofpi.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

योजनेसाठी ४८३ लाभार्थ्यांचा सहभाग

३१ डिसेंबरपर्यंत ४८३ लाभार्थ्यांनी या योजनेसाठी सहभाग नोंदवला आहे. त्यापैकी ४८ सविस्तर प्रकल्प आराखडे तयार झाले आहेत. ३४ आराखडे बॅंक कर्ज मंजुरीसाठी विविध बँकेकडे सादर करण्यात आले आहेत. बँकाकडून सात प्रकल्पांना कर्ज मंजुरी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: कर्णधारपदाची सवय झाली आहे! Shubman Gill चा विंडीजच्या खांद्यावरून ऑस्ट्रेलियावर निशाणा, म्हणाला...

Javed Akhtar : माझी मान शरमेने खाली गेलीये! तालिबानी मंत्र्यांच्या स्वागतावरून संतापले जावेद अख्तर, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : ठाण्याकडून मुंबईकडे येणाऱ्यांना मोठा फटका! घाटकोपर ते सायनपर्यंत वाहतूक ठप्प; खासदार संजय राऊतांनाही ट्रॅफिकचा सामना!

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा! 13 वर्षीय मुलीवर भावाने केला अत्याचार, दोन मित्रांचाही सहभाग; निर्जनस्थळी नेलं अन्...

संकल्पना सोप्या करणे ‘एआय’चे काम

SCROLL FOR NEXT