पुणे

प्रयोगशाळेतील संशोधन शेतापर्यंत पोहोचवा : कृषिमंत्री शिवराज चौहान

CD

प्रयोगशाळेतील संशोधन शेतापर्यंत
पोहोचवा : कृषिमंत्री शिवराज चौहान

कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या ३६ व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘‘कृषी क्षेत्रातील संशोधन केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता ते शेतापर्यंत पोहोचले पाहिजे. संशोधनातून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणींवर प्रभावी उपाय मिळाले पाहिजेत,’’ असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या ३६ व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन नॅस कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी (ता.२५) कृषिमंत्री चौहान यांच्या हस्ते झाले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी संशोधन व शिक्षण विभाग (डीएआरई) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) यांचे वरिष्ठ अधिकारी, उपमहासंचालक, अतिरिक्त महासंचालक तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कृषी शिक्षणात आवश्यक सुधारणा आणि प्राधान्यक्रमांवर या परिषदेत चर्चा होत आहे.
‘‘कृषी शिक्षणाचे यश केवळ किती पदव्या दिल्या यावर मोजता येणार नाही. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये किती ज्ञान व कौशल्य निर्माण झाले आणि त्याचा शेतकऱ्यांच्या जीवनात किती प्रत्यक्ष बदल झाला, यावर ते मोजले गेले पाहिजे,’’ असे चौहान यांनी स्पष्ट केले. कृषी शिक्षण अधिक व्यावहारिक, तंत्रज्ञानाधारित आणि शेतकऱ्यांच्या गरजांशी सुसंगत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी विद्यापीठे, आयसीएआर, कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), शेतकरी उत्पादक संघटना (एफफीओ), उद्योग आणि शेतकरी यांच्यातील समन्वय वाढवून संशोधनाचा थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर त्यांनी भर दिला. विद्यापीठांनी स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करून त्यासाठी कृती आराखडे तयार करावेत. तसेच संशोधनाच्या परिणामांचे मोजमाप करून त्यातून प्रत्यक्ष किती बदल घडला, हे तपासले पाहिजे. प्रत्येक परिषदेतून ठोस निर्णय झाले पाहिजेत आणि त्यांची अंमलबजावणीही झाली पाहिजे, असे चौहान म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना चौहान म्हणाले, की सध्याच्या गरजा आणि परिस्थितीनुसार कृषी शिक्षणाची पुनर्रचना करण्याची गरज व्यक्त केली. विकसित भारतासाठी विकसित कृषी आणि समृद्ध शेतकरी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे. हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, वेगाने बदलणारे तंत्रज्ञान, नवीन पिकांचे रोग आणि जमिनीचे आरोग्य यांसारख्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी कृषी शिक्षणात आवश्यक बदल करावे लागतील, असे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाधारित शेतीकडे वाटचाल
कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांनी विकसित भारतासाठी मजबूत आणि समृद्ध कृषी क्षेत्रासोबत सक्षम शेतकरी आवश्यक असल्याचे सांगितले. भारताने अन्नटंचाईपासून अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेपर्यंत केलेला प्रवास हा शेतकरी, शास्त्रज्ञ, शिक्षक आणि कृषी संस्थांच्या सामूहिक योगदानाचा परिणाम आहे. आता कृषी क्षेत्र अधिक तंत्रज्ञानाधारित, नावीन्यपूर्ण आणि भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता आणि कृषी व्यवसायाच्या माध्यमातून तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करून त्यांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठांनी शिक्षण आणि संशोधन शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडून कृषी क्षेत्राच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मनुष्यबळ तयार करावे, असे आवाहन चौधरी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT