पुणे

सातारारोड कृषी तंत्रज्ञानासाठी प्रयत्न

CD

सातारारोडला कृषी तंत्रज्ञान आणणार

मृदुला घाडगे-सपकाळ; ज्येष्ठ नागरिक संघासह विविध संस्थांतर्फे सत्कार

सातारारोड, ता. २१ : पाडळी स्टेशन, सातारारोड या गावाला शेतीचे मोठे क्षेत्र लाभले आहे. या गावासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणण्याचा व गावातील शेती क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्याचा आणि माहेरच्या ऋणातून उतराई होण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, अशा शब्दांत कृषी उपसंचालक या पदावर निवड झालेल्या मृदुला घाडगे-सपकाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परीक्षेद्वारे कृषी उपसंचालकपदी निवड झाल्याबद्दल मृदुला घाडगे-सपकाळ यांचा पाडळी स्टेशन, सातारारोड येथे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक संघ, सत्यशोधक ज्योत्याजीराव बयाजीराव फाळके पाटील ट्रस्ट, चंद्रकांत वसंतरावदादा पाटील विद्यालय, तनिष्का ग्रुप, संस्कृती महिला मंडळ, जरंडेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, आयडीबीआय बॅंक, विविध संस्था, संघटनांच्या वतीने सत्कार झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मृदुला यांची आई रजनी घाडगे, वडील अर्जुन घाडगे, तसेच पती विनायक सपकाळ, सासरे शंकर सपकाळ, सासू कुसुम सपकाळ, बाळकृष्ण बने, महादेव सूर्यवंशी, आनंदराव साळुंखे, महेश साळुंखे, अशोक साळुंखे, सत्यशोधक ज्योत्याजीराव बयाजीराव फाळके पाटील ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रकाश फाळके, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ फाळके, वसंत फाळके, सरपंच किशोर फाळके, ॲड. पुरुषोत्तम बारसवडे, संतोष मोरे, तनिष्का ग्रुपच्या योगिता फाळके, संस्कृती महिला मंडळाच्या शीतल फाळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना घाडगे-सपकाळ म्हणाल्या, ‘‘आई-वडील यांचे अपार कष्ट, माहेरच्या ग्रामस्थांकडून व येथील शाळेतून होत गेलेले संस्कार यामुळे माझी जडणघडण झाली. माझ्या यशामध्ये आई-वडील यांच्यासह पती, सासू-सासरे यांचा मोलाचा वाटा आहे. मोठे ध्येय गाठण्याचे स्वप्न प्रत्येकाने बघितले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. एक दिवस नक्कीच आपला येतो, तो दिवस मला माझ्या आयुष्यात आणायचा होता. त्यासाठी मी हळूहळू टप्प्याटप्प्याने प्रयत्न करत गेले आणि मला यश आले. आपल्या गावाला चांगला वारसा लाभला आहे. या गावात मोठमोठ्या व्यक्ती होऊन गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या गावाच्या शेती क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करून मला मिळालेल्या या संधीचे सार्थक करण्याचा माझा प्रयत्न राहील.’’
या वेळी ॲड. पुरुषोत्तम बारसवडे, आनंदराव गायकवाड, सुरेखा फाळके, आयडीबीआय बॅंकेचे अनुराज पुजारी, आर. डी. फाळके, सुधाकर फाळके, महेश फाळके यांचीही भाषणे झाली. प्रदीप फाळके यांनी प्रास्ताविक केले. प्रथमेश फाळके यांनी सूत्रसंचालन केले. शीतल फाळके यांनी आभार मानले.

चौकट
-------
मानिनी पुरस्काराने होणार सन्मान
---------
पाडळी स्टेशन, सातारारोड येथील संस्कृती महिला मंडळ व तनिष्का ग्रुपच्या वतीने दर वर्षी महिला दिनानिमित्त एका महिलेला मानिनी पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी येत्या आठ मार्चला मृदुला घाडगे-सपकाळ यांना मानिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी शीतल फाळके यांनी केली.
----
छायाचित्र ओळी
26B04658
पाडळी स्टेशन, सातारारोड : कृषी उपसंचालकपदी निवड झाल्याबद्दल मृदुला घाडगे-सपकाळ यांचा सत्कार करताना संस्कृती महिला मंडळ व तनिष्का ग्रुपच्या सदस्या.

----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC : फायनल सोडा, पाकिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचणे अवघड झाले; न्यूझीलंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने गणित बिघडले

Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO

Santosh Deshmukh Case: खटल्यातील विलंबामुळे सरकारी पक्षाला तंबी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी

Solapur Dhule Highway Accident: चार दिवसांपूर्वी साखरपुडा, परीक्षेसाठी लातूरला निघाले अन् काळाने गाठले

Ramadan 2026: रमजानमध्ये इबादत, शांती आणि सवाबाचा अनुभव घ्यायचा आहे? भारतातील 'या' मशिदींना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT