Aadinath-Chavan 
पुणे

आदिनाथ चव्हाण ‘ॲग्रोवन’च्या संपादक-संचालकपदी

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘ॲग्रोवन’ या कृषी दैनिकाच्या संपादक- संचालकपदी आदिनाथ चव्हाण यांची पदोन्नतीसह नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते ‘ॲग्रोवन’च्या संपादकपदी काम करत आहेत.

देशातील एकमेव कृषी दैनिक असणाऱ्या ‘ॲग्रोवन’ने गेल्या १५ वर्षांपासून शेती, शेतीपूरक उद्योग, कृषी संशोधन आणि ग्रामविकास क्षेत्रांमध्ये स्वतःचा ठसा उमटवत असताना राज्यातील असंख्य शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेतीचा विचार आणि आनुषंगिक संशोधन पोचवून त्यांच्या व्यवसायात आणि रोजच्या जगण्यात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.

चव्हाण गेली ३१ वर्षे ‘सकाळ माध्यम समूहा’त कार्यरत असून ‘ॲग्रोवन’च्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारण्याआधी त्यांनी ‘सकाळ’च्या संपादकीय विभागात विविध पदांवर काम केले आहे. ‘ॲग्रोवन’चे संपादक म्हणूनही त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली. कृषी क्षेत्रातील बदलांवर त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. ‘ॲग्रोवन’द्वारा कृषी क्षेत्राला निश्‍चित दिशा देण्याच्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या प्रयत्नांमध्ये त्यांचा लक्षणीय सहभाग आहे. शेती आणि ग्रामीण विकासासाठीच्या अनेक उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

शेतकऱ्यांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम आणि आधुनिक शेतीसाठी आवश्‍यक असणारी कौशल्ये राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून चव्हाण यांनी योगदान दिले आहे.

‘ॲग्रोवन’चे संपादक- संचालक म्हणून चव्हाण यांच्याकडे ‘ॲग्रोवन’शी संबंधित सर्व घटकांच्या समन्वयाबरोबरच ‘ॲग्रोवन’च्या पुढील वाटचालीची दिशा ठरवण्याची मुख्य जबाबदारी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिम बंद केलं, आठवड्यात साहित्य विकायचं होतं, दगडूशेठ मदतीला धावला... 'कृष्णाईच्या लेकी' अभिनेत्याने सांगितला अनुभव

Gangapur Maize Crop Crisis : करपलेली मका मुरघाससाठी विकण्याची वेळ ; उत्पादन खर्चही निघणे कठीण; पश्चिम महाराष्ट्र-कर्नाटकातून चाऱ्यासाठी मागणी

Kolhapur Mumbai Special Train : दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून कोल्हापूर ते मुंबई, कलबुर्गीसाठी विशेष गाड्या जाहीर; पाहा रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक

Gyanesh Kumar Petition : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ; थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल, 'ते' 14 निर्णय वादाच्या भोवऱ्यात

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

SCROLL FOR NEXT