पुणे

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाला हवेत वाढीव ४ कोटी

CD

PNE26W50670
सोलापूर : विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनासमोरील झाकलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाला हवेत वाढीव ४ कोटी
विद्यापीठाने शासनाला पाठविला प्रस्ताव; दोन वर्षांपासून पुतळा झाकलेलाच

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : येथील विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसविला आहे. तीन वर्षे होत आली तरी तो झाकलेलाच आहे. १४ कोटी ८२ लाख रुपये खर्च झाला आणि चारवेळा मुदतवाढ दिली, तरीही कामे पूर्ण झालीच नाहीत. आता चार कोटींचा वाढीव निधी मिळावा म्हणून विद्यापीठाने राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला आहे.
हिरज रोडवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ४८२ एकर जमीन आहे. त्याठिकाणी विद्यापीठाने नवीन प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन बांधले आहे. त्यासमोर इंडोअर स्टेडिअम आणि १५७ फुटांचा वॉच टॉवर उभारला आहे. तेथेच पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा हाती पिंड घेतलेला पूर्णाकृती पुतळा बसवला आहे. सध्या काम अपूर्ण असल्याने तो झाकलेला आहे. स्मारकाभोवती चौथरा, बारव (अहिल्यादेवींनी बांधलेल्या विहिरीप्रमाणे), गार्डन, कारंजे उभारणी करण्यात आली आहे. स्मारक पाहायला येणाऱ्यांची बैठक व्यवस्थाही तेथे आहे. आता स्मारकाभोवती अहिल्यादेवींच्या कार्याबद्दलचे शिल्प, नवीन रस्ता, अशी काही कामे बाकी आहेत. तत्पूर्वी, २०२२ पासून स्मारकाचे काम सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनीही वारंवार सूचना केल्या, बैठका बोलावल्या. मात्र, काम अजून पूर्ण झालेले नसून आता शासनाकडून चार कोटींचा निधी मिळाल्यावरच स्मारकाचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण होईल, नाहीतर आणखी काही महिने पुतळा झाकूनच ठेवावा लागेल.

चौकट
मंगळवारी ‘सिनेट’ सभा;
‘या’ विषयांवर होणार चर्चा
मंगळवारी (ता. २२) सिनेटची (अधिसभा) बैठक होणार आहे. ही बैठक ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने होईल. ज्यांना उपस्थित राहता येईल, असे सदस्य विद्यापीठात येतील आणि ज्यांना यायला जमणार नाही, त्यांना ऑनलाइन सहभागी होता येणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती आणि विद्यार्थ्यांना शुल्कमाफी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक, या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

कोट :
विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी वाढीव निधी आवश्यक आहे. त्यासाठी वाढीव चार कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
- डॉ. अतुल लकडे, कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT