पुणे

हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्यास अटक

CD

हद्दपारीचे उल्लंघन
करणाऱ्यास अटक
अहिल्यानगर ः जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलेला सराईत आरोपी प्रतीक अजित लालबोंद्रे (वय २५, रा. खळेवाडी, भिंगार) या आदेशाचे उल्लंघन केल्याने अटक करण्यात आले. त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक लालबोंद्रे याच्यावर मारामारी करणे, मालमत्तेशी संबंधित गुन्हे दाखल झाले होते. भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव नगर उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे पाठविला होता. पाटील यांनी प्रतीक लालबोंद्रे याला २० ऑगस्ट २०२६ पासून एक वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केले होते. प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता जिल्ह्यात प्रवेश करून भिंगार परिसरात तो आला होता. स्थानिक गुन्हे शाखेला तो भिंगार परिसरात आल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. पोलिस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार व्ही. आर. गारूडकर पुढील तपास करीत आहेत.
----------------------
केडगावात
तरुणाची आत्महत्या
अहिल्यानगर ः शहरातील केडगाव परिसरातील वैष्णवनगर येथे ३९ वर्षीय व्यक्ती बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पवन पंढरीनाथ कोतकर (वय ३९, रा. रभाजीनगर, केडगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पवन कोतकर हे बुधवारी दुपारी वैष्णवनगर परिसरात बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांना खासगी रुग्णवाहिकेव्दारे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
---------------
ॲसिड हल्ल्याची धमकी
अहिल्यानगर, ता. ३० ः ब्युटीशियन म्हणून काम करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची, चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी जावेद अल्ताफ शेख (रा. झेंडीगेट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणीबाबत जानेवारी २०२६ पासून ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रामचंद्र खुंट येथील एका कॉम्प्लेक्समधील सलूनमध्ये, तसेच अन्य ठिकाणी हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. संशयित आरोपीने तरुणीच्या इच्छेविरुध्द तिच्या शरीराला अश्लील स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School Diwali Vacation District Wise : शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांबाबत पालकांमध्ये संभ्रम; तुमच्या जिल्ह्यात शाळा कधी बंद होणार अन् कधी सुरू? पाहा जिल्ह्यानिहाय संपूर्ण यादी!

CBSE Class 10 Syllabus Change: 'सीबीएसई'च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल! दहावीच्या अभ्यासक्रमातून 'पर्यावरण शिक्षण' विषय वगळला, व्यावसायिक शिक्षण अनिवार्य

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Smile Day : खळखळून हसा! एक नोव्हेंबरला साजरा करा ‘स्माइल डे’; ‘सकाळ माध्यम समूहा’चा उपक्रम

ChatGPTचा सल्ला ठरला जीवघेणा! ३१ वर्षीय महिलेचा मृत्यू; एआयवर विश्वास ठेवणे ठरतेय धोकादायक

SCROLL FOR NEXT