पुणे

नगर : अहिल्यानगरला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दिव्यांगांची हेळसांड

CD

अहिल्यानगरला जिल्हा रुग्णालयात
तपासणीसाठी दिव्यांगांची हेळसांड
-----
तासन् तास थांबावे लागते रांगेत; रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष
-----
ॲग्रोवन वॄत्तसेवा
अहिल्यानगर ः दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या तपासणीसाठी अहिल्यानगर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी जिल्हाभरातून दिव्यांग बांधव भल्या सकाळीच येत असतात. ही संख्या जवळपास दोनशे ते चारशेच्या घरात असते. मात्र त्यांना जिल्हा रुग्णालयाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसतो. सकाळपासून तीन-चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर तपासणीला सामोरे जावे लागते. येथे साधा सुरक्षारक्षकही नसल्याने उन्हातान्हात दिव्यांग बांधवांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.
जिल्हाभरातून आलेले दिव्यांग बांधव भल्या पहाटे पहिले आॅनलाइन नोंदणीसाठी त्यांना रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर केस पेपर काढण्यासाठी दुसऱ्यांदा आणि त्यांनतर डॉक्टरांकडील तपासणीसाठी तिसऱ्यांदा रांगेत उभे राहण्याची वेळ येते. दिव्यांग बांधवांचा तीन ते चार तासांचा वेळ हा रांगेत उभे राहण्यातच जातो. त्यांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे. दिव्यांगांची हेळसांड थांबवणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकच दिवस तपासणी होत असल्याने या दिवशी गर्दी असते. त्यात रुग्णालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे दिवसभर दिव्यांग बांधवांना आपला वेळ तेथे खर्ची घालावा लागतो. रुग्णालयात अन्य विभागांत जावे लागते. दिव्यांगांसाठी येथे कोणतीही व्यवस्था केलेली नाही. व्हीलचेअरही मिळत नाही. त्यामुळे दिव्यांगांच्या अडचणी वाढल्या आहेत. गर्दी कमी होण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा ही तपासणी होण्याची मागणी केली जात आहे. जिल्हा रुग्णालयात बुधवारी (ता. ६) शेवगाव येथील ज्येष्ठ कलावंत साहेबराव राऊत यांनी अंधत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. त्यांच्या डोळ्याला छिद्र असल्याने त्यांची दृष्टी गेल्या काही वर्षांत खूप कमी झाली. त्यांनी तीन तास रांगेत उभे राहण्याचे दिव्य पार केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मोतिबिंदू आॅपरेशनचा सल्ला दिला. मोतिबिंदूचे ऑपरेशन करा मग पाहू, असे त्यांना सांगण्यात आले. वास्तविक, त्यांना यापूर्वीच डोळ्याचे मोतिबिंदूचे आॅपरेशन करता येणे शक्य नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. मग आता पुढे काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. एकीकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन गाजत असताना गरजूंच्या माथी मात्र हेळसांड सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT