पुणे

फुटबॉल

CD

PNE26W29016
अहिल्यानगर ः राज्य आंतरजिल्हा स्पर्धेत सहभागी जिल्ह्याचा संघ. समवेत मुख्य प्रशिक्षक प्रसाद पाटोळे, संघ व्यवस्थापक अश्‍विनी पाटोळे आदी.

नगर सब ज्युनिअर मुलींचा संघ जाहीर
पालघरमध्ये आयोजित राज्य आंतरजिल्हा स्पर्धेत सहभागी
अहिल्यानगर, ता. २२ ः महाराष्ट्र राज्य फुटबॉल असोसिएशन (डब्ल्यूआयएफए) आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सब ज्युनिअर मुलींची फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे जिल्हा संघाची जाहीर करण्यात आला आहे.

ही स्पर्धा २५ जूनपर्यंत पालघर येथे रंगणार आहे. अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांचे अभिनंदन केले. वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, खालिद सय्यद, अमरजित सिंग शाही, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ, खजिनदार रिशपाल सिंग परमार, सहखजिनदार रणबीर सिंग परमार, तसेच कार्यकारिणी सदस्य राजू पाटोळे यांनी संघाला स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले. या स्पर्धेपूर्वी संघाच्या सराव शिबिरासाठी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल गुलमोहर फुटबॉल क्लबचे प्रमुख जोएब खान आणि प्रशिक्षक सुभाष कनोजिया यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
-----------
मुलींचा संघ
प्रांजल काकडे (कर्णधार), सिद्धी पोटे, काव्या पेटकर, रुहिका सैंदाणे, स्पृहा वैद्य, जान्हवी देठे, कियाना गांधी, आराध्या खंडेलवाल, जस्मित खुराणा, सिद्धी कुरुंद, सायशा कर्डिले, लेहेर भंडारी, समृद्धी झिने, अवनी वाघमारे, महती बहुरुपी, आर्या शिरसाठ, रिद्धी चेमटे आणि तनुजा गुंजाळ. मुख्य प्रशिक्षक प्रसाद पाटोळे, संघ व्यवस्थापक अश्‍विनी पाटोळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: पोटासाठी कारखान्यात मजुरी अन् स्वप्नासाठी फुटबॉल... दुहेरी लढाई लढणारा पोरगाच ठरला जर्मनीचा 'तारणहार'

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT