PNE26W61608
अहिल्यानगर ः कराओके असोसिएशनच्या सभेला उपस्थित जिल्ह्यातील कलाकार.
-------------
कराओके असोसिएशनची नगरमध्ये स्थापना
अहिल्यानगर, ता. २५ ः जिल्ह्यातील सर्व कलाकारांच्या हितासाठी व त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कराओके असोसिएशन ऑफ आर्टिस्ट फॉर म्युझिक या राज्यस्तरीय संस्थेच्या अहिल्यानगर शाखेची नुकतीच स्थापना करण्यात आली. अजित रोकडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
कराओके असोसिएशन ऑफ आर्टिस्ट फॉर म्युझिक ही राज्यस्तरीय संस्था आहे. अध्यक्ष राजकुमार तिखे, वैजू चांडवले, आरती दीक्षित, प्रकाश सावंत आदी गायक, कलाकार कार्यकारिणी सदस्य आहेत. राज्यभरातील कलाकारांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्या अडीअडचणी दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, शासकीय योजनांची त्यांना माहिती देणे, स्पर्धांचे आयोजन करणे आदी उद्दिष्टे या संस्थेची आहेत. अहिल्यानगर मध्येही या संस्थेची सभा सावेडीतील रावसाहेब पटवर्धन सभागृहात झाली. या सभेत जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. डॉ. दमन काशीद यांची आणि प्रशांत बंडगर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तर सारिका रघुवंशी यांची कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आर्किटेक्ट व अनाम प्रेमचे अजित माने यांची सचिवपदी, तर सचिन परदेशी यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. शैलेंद्र खंडागळे व वैदेही बल्लाळ यांची संघटकपदी निवड करण्यात आली. गायक अजय दगडे, जुबेर शेख व आबीद खान यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.