पुणे

नगर : अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या आठशे पंच्याएंशी कोटींच्या आराखड्यास मंजुरी

CD

प्रस्तावांना विलंब झाल्यास
अधिकाऱ्यांवर कारवाई
-----
पालकमंत्री विखे पाटील ः ‘डीपीडीसी’च्या ८८५ कोटींच्या आराखड्यास मंजुरी
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः अहिल्यानगर येथे जिल्हा नियोजन समितीसाठी ८८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, अंतिम आराखड्यास मंजुरी दिली. या समितीअंतर्गत लोकप्रतिनिधींनी पुढील दहा दिवसांच्या आत शिफारशी सादर कराव्यात, प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण करावी. वेळेत निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित निधी इतर विकासकामांसाठी वळविण्यात येऊन प्रस्तावांना विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक झाली. पालकमंत्री डॉ. विखे पाटील, जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांच्यासह पदाधिकारी, आमदार व अधिकारी उपस्थित होते. त्या वेळी बोलत होते.
या निधीतून प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी १५ वर्षांपेक्षा जुनी झालेली शासकीय वाहने निर्लेखित करावीत. तहसीलदार व नव्याने निर्माण झालेल्या तालुक्यांसाठी नवीन वाहने खरेदीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. शहरांमधील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, तसेच अत्याचाराच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतीने स्वतःच्या निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील. पोलिस विभागाकडून त्याचे संनियंत्रण केले जाईल. पुढील पाच वर्षांच्या वार्षिक देखभाल करारासह निविदा प्रक्रिया राबविण्यात याव्यात.
-----
महत्त्वाचे निर्णय
- विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहाची उभारणीः २० कोटी.
- टँकरमध्ये शुद्धीकरण केलेले पाणी.
- टंचाईग्रस्त गावात साठवण टाक्यांमध्येच पाणी सोडले जाणार.
- दहा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावातून महामार्ग जात असल्यास चौकात सीसीटीव्ही कॅमेरे.
- जिल्हास्तरीय कृषी पुरस्काराचे वितरण.
- सीना नदीचे सुशोभीकरण केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! व्यवस्थापनाच्या वादामुळे रखडलेली शिक्षक भरती आता थेट होणार; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा..

Rahul Dravid Son Samit Dravid: राहुल द्रविडच्या मुलाने मैदानात घातला धुमाकूळ; 360° फटकेबाजीचा VIDEO व्हायरल

Land Acquisition: २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा! भरपाईवाढीच्या दाव्यांवर सहा महिन्यांत निर्णयाचे उच्च न्यायालयाचे आदेश

Amboli Waterfall : 'प्रति महाबळेश्वर' आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित! फेसाळणारे पाणी अन् दाट धुक्याचा थरार अनुभवण्यासाठी गर्दी; गोवा-कर्नाटकातूनही पर्यटकांची पावले वळली

Sillod News: सिल्लोडमध्ये खळबळ! डोंगरावर केमिकलच्या टाक्या टाकून पेटवल्या; उग्र वासाने नागरिकांमध्ये भीती, धोक्याची शक्यता..

SCROLL FOR NEXT