अहिल्यानगरमध्ये टोमॅटो, भुईमूग शेंगा आणि काकडीला मागणी कायम
फळ-भाजीपाल्यांच्या दरात चढ-उतार; फळबाजारात केशर आंब्याची आवक अधिक
सूर्यकांत नेटके/ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात टोमॅटो, भुईमूग शेंगा आणि काकडीला चांगली मागणी कायम होती. भाजीपाला तसेच फळांच्या दरात चढ-उतार सुरू होते. फळबाजारात विशेषतः केशर आंब्याची आवक अधिक असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.
बाजार समितीत मागील आठवड्यात दररोज सुमारे २ हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. त्यामध्ये बटाट्याची दररोज सुमारे ७०७ क्विंटल आवक झाली. बटाट्याला प्रतिक्विंटल ३०० ते १ हजार ७०० रुपये दर मिळाला.
टोमॅटोची सुमारे ३६७ क्विंटल आवक झाली असून त्याला प्रतिक्विंटल ५०० ते २ हजार ५०० रुपये दर मिळाला. वांग्याची ४४ क्विंटल आवक होऊन ५०० ते २ हजार ५०० रुपये दर मिळाला. फ्लॉवरची १०१ क्विंटल आवक झाली असून त्याला ५०० ते ४ हजार रुपये दर मिळाला. कोबीची १३१ क्विंटल आवक होऊन ३०० ते १ हजार ५०० रुपये दर मिळाला.
काकडीची ११६ क्विंटल आवक झाली असून तिला प्रतिक्विंटल ५०० ते २ हजार ३०० रुपये दर मिळाला. गवारची १० क्विंटल आवक होऊन १ हजार ते ५ हजार रुपये दर मिळाला. घोसाळ्याची १३ क्विंटल आवक होऊन १ हजार ते ४ हजार रुपये दर मिळाला. दोडक्याची १८ क्विंटल आवक झाली असून त्याला १ हजार ते ५ हजार रुपये दर मिळाला. कारल्याची ३० क्विंटल आवक होऊन १ हजार ते ४ हजार रुपये दर मिळाला.
भेंडीची ५९ क्विंटल आवक झाली असून तिला ५०० ते ३ हजार ५०० रुपये दर मिळाला. घेवड्याची ३ क्विंटल आवक होऊन ५ हजार ते ९ हजार रुपये दर मिळाला. लसणाची दररोज सुमारे २५ क्विंटल आवक झाली असून त्याला २ हजार ते १२ हजार रुपये दर मिळत आहेत. हिरव्या मिरचीची ८५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. शेवग्याची ३१ क्विंटल आवक होऊन १ हजार ते ३ हजार ५०० रुपये दर मिळाला. शिमला मिरचीची ३१ क्विंटल आवक होऊन १ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. आल्याची ३७ क्विंटल आवक झाली असून त्याला ३ हजार ते ७ हजार ५०० रुपये दर मिळाला. गाजराची १४ क्विंटल आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार रुपये दर मिळाला. वाटाण्याची ११ क्विंटल आवक झाली असून त्याला प्रतिक्विंटल २ हजार ते ७ हजार रुपये दर मिळाला.
पालेभाज्यांमध्ये दररोज सुमारे ६ हजार १५० मेथी जुड्यांची आवक झाली असून तिला शेकडा ८०० ते ३ हजार २०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीच्या ५ हजार ९५० जुड्यांची आवक झाली असून तिला ३ हजार ते ८ हजार ४०० रुपये दर मिळाला. पालक भाजीची ३५० जुड्यांपर्यंत आवक होऊन १ हजार ते ३ हजार रुपये दर मिळाला. शेपू भाजीची ६०० जुड्यांची आवक झाली असून तिला सुमारे ४ हजार रुपये दर मिळाला. लिंबाची ४० क्विंटलपर्यंत आवक झाली असून तिला प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते १० हजार रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.
चौकट...
केशर आंब्याला ४५०० ते ८ हजारांचा दर
अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सुमारे ५०० क्विंटल फळांची आवक होत आहे. पेरूची १४ क्विंटल आवक झाली असून त्याला प्रतिक्विंटल १ हजार ते २ हजार २०० रुपये दर मिळत आहे. आंब्यामध्ये सध्या केशर आंब्याची सर्वाधिक आवक होत असून त्याला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ८ हजार रुपये दर मिळत आहे. तोतापुरी आंब्याची दररोज १० क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ३ हजार रुपये दर मिळत आहे. हापूस आंब्याची २५ क्विंटलपर्यंत आवक होत असून त्याला ४ हजार ५०० ते ६ हजार रुपये दर मिळत आहे. गावरान आंब्याची ५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते २ हजार रुपये दर मिळत आहेत. मोसंबीची ६ क्विंटलपर्यंत आवक होऊन ३ हजार ते ७ हजार रुपये दर मिळत आहे. संत्र्याची २१ क्विंटलपर्यंत आवक झाली असून त्याला ४ हजार ५०० ते १० हजार रुपये दर मिळत आहेत. डाळिंबाची २ क्विंटल आवक झाली असून त्याला ३ हजार ते ९ हजार रुपये दर मिळाला. पपईची ३ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते १ हजार ५०० रुपये दर मिळाला. केळीची ५ क्विंटल आवक झाली असून तिला प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपये दर मिळाला. कलिंगडाची १०० क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते १ हजार २०० रुपये दर मिळाला. खजुराची ५४ क्विंटलपर्यंत आवक झाली असून त्याला ५०० ते ३ हजार रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.