पुणे

बंदीवान योग बातमी

CD

PNE26W29134

अहिल्यानगर ः जिल्हा कारागृहात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.


जिल्हा कारागृहात योग दिन साजरा

अहिल्यानगर, ता. २२ ः अहिल्यानगर जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी २३० बंदींनी योग दिन कार्यक्रमात सहभाग नोंदवत योगातून निरोगी जीवनाचा संकल्प केला.


अहिल्यानगर जिल्हा कारागृह, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय पुरस्कृत जनशिक्षण संस्थान, तसेच अहिल्यानगर महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश बी. वाय. फड, कारागृह अधीक्षक संतोष कवार, योग प्रशिक्षक संजय सुरसे आदी उपस्थित होते.

यावेळी न्यायाधीश फड म्हणाले, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. मानसिक आरोग्य, सकारात्मक ऊर्जा आणि निरोगी जीवनासाठी योगसाधना अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. कारागृह अधीक्षक कवार यांनी धकाधकीच्या व तणावग्रस्त जीवनात योगाचे महत्त्व अधोरेखित केले. तुरुंगाधिकारी विजय साळुंके, अरुण मदने, हिराचंद आंबोरे, सुरेश जगर, संदीप जगदाळे, राहुल पठारे, नंदकुमार शिंदे, श्रीकांत गोरवडे, मोहसीन शेख, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या आर्ट ऑफ लिव्हिंग शाखेमार्फत कारागृहात सुरू करण्यात आलेल्या डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बंदींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT