पुणे

सिंगल

CD

जुन्या वादातून तरुणाला मारहाण

अहिल्यानगर, ता. १४ ः नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि टनक वस्तूने बेदम मारहाण केल्याची घटना ११ मे रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन बाबासाहेब शिकारे (वय २६, रा. धनगरवाडी, ता. नगर) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे धनगरवाडी येथील शिकारे वस्तीवर हळदीच्या कार्यक्रमास गेले होते, तो कार्यक्रम आटोपून घरी जात असताना त्यांना गावातीलच वैभव हरिभाऊ वाकडे आणि आदित्य हरिभाऊ वाकडे यांनी अडवले. काही वेळातच त्यांचे जेऊर येथील मित्र ओम आढाव, गौरव जरे, कृष्णा तोडमल आणि तुषार वाघ हे त्या ठिकाणी आले. या सर्वांनी मिळून जुन्या वादातून सचिन यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
---
घर फोडून दागिन्यांची चोरी

अहिल्यानगर, ता. १४ ः शहरातील भरवस्तीत असलेल्या कोर्ट गल्ली भागात घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून एक लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंगल भाऊसाहेब फुलसौंदर (वय ६६, रा. विठ्ठल मंदिराशेजारी, कोर्टगल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या केअर टेकर आहेत. त्या १० मे रोजी दुपारी ४ च्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे स्क्रू काढून आत प्रवेश केला. घरातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठण, ४० हजार रुपयांचा सोन्याच्या मण्यांचा सर, ४० हजार रुपयांचे तीन पदरी गंठण आणि १२ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, असा एकूण एक लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संभाजी गायकवाड आणि पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी मंगल फुलसौंदर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या KYC प्रक्रियेला ब्रेक! पोर्टल संथ, शेतकऱ्यांची सेवा केंद्रांवर गर्दी; पोर्टल स्लोमुळे शेतकरी त्रस्त

IND vs ZIM: MY BAD...! ईशान किशनने सोपा रन-आऊट सोडला अन् डोक्यालाच हात लावला; Video Viral

Ayushman Card : मोबाईलवरून घरबसल्या आयुष्मान कार्ड कसे काढायचे? 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, वाचा अर्जाची स्टेप-बाय-स्टेप माहिती

Kolhapur Crime: सरकारी नोकरी लावतो, आमिष दाखवून ४८ लाखांची फसवणूक; दोघांना अटक, एक फरार

Latest Marathi News Update : दिल्लीला जाणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीवारीवर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT