पुणे

नगर- जिल्हा सहकारी बॅकेत थोरात-विखे यांच्या पॅनलचे वर्चस्व, लंकेचाही विजय

CD

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत
थोरात-विखे पॅनेलला १८ जागा

नीलेश लंके विजयी; राम शिंदे गटाला दोन जागा

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ जागांपैकी थोरात-विखे यांच्या पॅनेलला १८ जागा मिळाल्या. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या. सर्वाधिक चर्चेतील आणि जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पारनेरमधून दणदणीत विजय मिळवत खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणात प्रवेश केला आहे.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत प्रयत्न केले. परंतु, विश्वासात घेतले नसल्याचे सांगत थोरात-विखे यांच्या पॅनेलच्या विरोधात भूमिका घेतली. अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत सोसायटी मतदारसंघातील १० व बिगरशेती मतदारसंघातील एक अशा ११ जागा बिनविरोध झाल्या. १० जागांसाठी सोमवारी (ता. २) मतदान झाले. मंगळवारी (ता. ३) मतमोजणी झाली. दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आठ जागा थोरात-विखे यांच्या पॅनेलला मिळाल्या. एका जागेवर लंके निवडून आले, तर दोन जागा राम शिंदे गटाला मिळाल्या आहेत. महिला राखीव गटात शिवसेना नेत्या हर्षदा काकडे यांनी जोरदार टक्कर दिली. अकोल्यात आमदार किरण लटामटे, तसेच भाजप नेते जालिंदर वाकचौरे आणि राहुरीतून सत्यजित कदम यांचा पराभव झाला. विजयानंतर संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

जिल्हा बँकेचे नूतन संचालक
बिनविरोध संचालक ः आमदार मोनिका राजळे (पाथर्डी), बिपान कोल्हे (कोपरगाव), आमदार अक्षय कर्डिले (अहिल्यानगर), डॉ. सुजय विखे पाटील (राहाता), रणजित देशमुख (संगमनेर), माजी मंत्री शंकरराव गडाख (नेवासा), राजश्री घुले (शेवगाव), करण ससाणे (श्रीरामपूर), सुधीर घुमरे (जामखेड), दत्ता पानसरे (श्रीगोंदा), खासदार नीलेश लंके (पारनेर), अकोले ः संजीवनी गायकर-शिंदे (अकोले), आमदार प्राजक्त तनपुरे (राहुरी), कर्जत ः ज्योती शिंदे (कर्जत), बिगरशेती मतदारसंघ ः सचिन जगताप, शेतीपूरक मतदारसंघ ः आमदार आशुतोष काळे, महिला राखीव प्रतिनिधी ः अनुराधा नागवडे व संगीता वाघ, वि.जा.भ.ज. विशेष मागास प्रवर्ग ः गणपतराव सांगळे, अनुसूचित जाती-जमाती ः माजी आमदार वैभव पिचड, इतर मागास प्रवर्ग ः कारभारी जावळे (विजयी).

Satara District Bank: जयकुमार गोरेंचा करिष्मा! ७५ पैकी ५३ मते घेत सातारा जिल्हा बँकेत दणदणीत विजय; अर्जुन काळेंचा दमदार प्रवेश, शेखर गोरेंना केवळ ७ मते

मोहम्मद आमीर, तू IPL 2027 मध्ये काव्या मारनच्या संघाकडून खेळणार का? पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला auction पूर्वीचा प्लान

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा! दिवाळीत पाणीकपात रद्द, MIDCचा निर्णय

Dharashiv News: भूम शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज! अनेक भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; विकासकामांचे भूमिपूजन

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT