पुणे

नगर : आठ नद्यांच्या काठच्या दोनशे तेवीस गावांना पुराचा धोका अहिल्यानगरला प्रशासनाकडून आराखडे ः पाचशे आपदा मित्र

CD

अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात
--
आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज; ५०० ‘आपदा मित्र’ प्रशिक्षणासह तैनात
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : अतिवृष्टी, धरणांमधून होणारा विसर्ग आणि नदीपात्रांतील अतिक्रमणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ प्रमुख नद्यांलगतची तब्बल २२३ गावे पूरप्रवण ठरत आहेत. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार केले असून, बचावकार्याकरिता आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रवरा आणि मुळा या दोन्ही नद्यांचा उगम अकोले तालुक्यात होतो. अकोले परिसरात अतिवृष्टी झाल्यास या नद्यांना पूरस्थिती निर्माण होते. प्रवरा नदीकाठावरील सर्वाधिक १०० गावे तर मुळा नदीकाठावरील २४ गावे पूरप्रवण आहेत. २००८ मध्ये प्रवरा नदीत ३८ हजार ९१३ क्युसेक प्रवाहाची नोंद झाली होती.

गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात असला तरी कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे आणि शेवगाव तालुक्यांतील ४० गावे पुराच्या धोक्यात येतात. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून विसर्ग वाढल्यानंतर ही परिस्थिती गंभीर बनते. २०१९ मध्ये गोदावरी नदीत २ लाख ९१ हजार ५२५ क्युसेक इतका विक्रमी प्रवाह नोंदविण्यात आला होता.

भिमा नदीकाठावरील श्रीगोंदे आणि कर्जत तालुक्यांतील २० गावे पूरप्रवण आहेत. घोड नदीकाठची ११ गावे, सीना नदीकाठची २० गावे, खैरी नदीकाठची ५ गावे आणि म्हाळुंगी नदीकाठची ३ गावेही धोक्याच्या यादीत आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सात इन्फ्लॅटेबल रबर बोटी, ५०० लाईफ जॅकेट, १५० लाईफ बोया, सर्च लाईट, स्ट्रेचर, पोर्टेबल टेन्ट, फर्स्ट एड किट, सेफ्टी हेल्मेट, रॅपलिंग रोप आदी साहित्य उपलब्ध आहे. अहिल्यानगर महापालिका, पोलिस विभाग, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी नगरपालिका तसेच कर्जत व श्रीगोंदे तहसील कार्यालयांकडे प्रत्येकी एक बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पूरप्रवण भागांतील ५०० स्वयंसेवकांना ‘आपदा मित्र’ म्हणून प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना लाईफ जॅकेट, हेल्मेट, गमबूट, रेनसूट, रोप आणि एलईडी टॉर्च यांसारखी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

कोट
“पूरप्रवण क्षेत्रांतील स्वयंसेवकांना आपत्कालीन बचावकार्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आवश्यक सुरक्षा साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले आहे.”
- डॉ. वीरेंद्र बडधे, जिल्हा व्यवस्थापन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT