पुणे

आणे येथील अपघातात एकाचा मृत्यू; नऊ जण जखमी

CD

आळेफाटा, ता. २६ : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर आणे (ता. जुन्नर) या येथे पिकअप व बोलोरो जीप या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (ता. २५) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली
तुकाराम पोपट मधे (वय ६५, रा. अकलापूर, ता. संगमनेर) यांचे आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मुत्यू झाला.तर सचिन सकारू पठारे (वय २३, रा. कोंभळणे), सुभाष पोपट दुधावडे (वय १९ रा. अकलापूर), किरण नारायण खंडागळे (वय २३, रा. म्हसुंडी), सुनील भिकाजी केदार (वय २७, रा. म्हैसगाव), अशोक दिलीप मढे (वय १९, रा. चास पिंपळदरी), संपत गंगाराम पठारे (वय ४२, रा. ओतूर), सुनील काळे (वय ३५ रा. नारायणगाव), दत्तू डोके- कोतूळ, नामदेव मढे (वय ५५ तिघे रा. ओतूर) अशी जखमींची नावे आहेत. तर गणेश लक्ष्मण खेडकर (वय २३, रा. ठाकूर निमगाव पोस्ट राक्षी, ता. शेवगाव, जि.अहिल्यानगर) यांनी दिली आहे. तर सुनील भिका केदार (वय २७, रा. म्हैसगाव, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोलोरे जीपचालकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिकअप (क्र. एमएच १६ डीपी० १०३) अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदूर पठार या ठिकाणाहून कलिंगड भरून मुंबईकडे निघाला होता. बुधवारी रात्री अहिल्यानगर - कल्याण महामार्गावर आणे गावाजवळ आळेफाटाकडून येत असलेल्या बोलोरो जीप (क्र. एमएच २० डिव्ही १३०४) आणि पिकाअपची धडक होऊन अपघात झाला. या दोन्हीही वाहनांमध्ये एकूण दहा जण बसलेले होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमित पोळ करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT