पुणे

अहिल्यानगर-कल्याण महामार्ग मृत्यूचा सापळा

CD

ओतूर, ता. २३ :  अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील ओतूर आणि डिंगोरे परिसरात अपघातांचे सत्र सुरूच आहे. अपघातांची वाढती मालिका नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या भीषण अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून अपघात रोखण्यासाठी थोडेफार प्रयत्न होत असले, तरी काही बेशिस्त आणि मुजोर वाहनचालकांमुळे महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
ओतूर पोलिसांनी अपघातप्रवण क्षेत्रात (ब्लॅक स्पॉट) रम्बलर, सूचना फलक आणि ब्लिंकर्स बसवून धोक्याची सूचना देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, वेगावर नियंत्रण न ठेवणारे आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणारे वाहनचालक स्वतःसह इतरांच्याही जिवावर उठले आहेत. वारंवार आवाहन करून आणि उपाययोजना राबवूनही अपघातांचे सत्र थांबत नाही. त्यामुळे उपाययोजना राबवण्यात प्रशासनाचे प्रयत्न कमी पडत आहेत, तसेच ‘आणखी किती बळी गेल्यावर वाहनचालकांना शिस्त लागणार?'' असा संतप्त सवालही स्थानिक नागरिक विचारत आहेत.

दुर्घटना घडल्यावरच जाग येते का?
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील ओतूर आणि डिंगोरे परिसरात काही अपघातांमध्ये दुचाकीवर तिघे, चौघे, पाच जण प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे नियम मोडणारे पोलिस प्रशासनाला दिसत नाहीत? की काही दुर्घटना घडल्यानंतरच थातुरमातूर कारवाई करून आपली पाठ थोपटून घेणार? काही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजनाही राबविणार का? असे संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.

बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका
वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ओतूर पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. सोमवारी (ता. २२) राबवलेल्या विशेष मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ वाहनचालकांवर  कारवाई करण्यात आली. यामध्ये मोबाइलवर बोलणे, काळ्या काचा, ट्रिपल सीट, विनाहेल्मेट आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांचा समावेश असून त्यांच्याकडून एकूण  ८५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ओतूर पोलिस ठाणे हद्दीतील वाढत्या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून, अपघातमुक्त परिसर व महामार्ग हेच प्रमुख उद्दिष्ट आहे.
- ज्ञानेश्‍वर बाजगिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, ओतूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

SCROLL FOR NEXT