पुणे

नगर ः अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाअभावी नऊ लाख ६२ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत. - १३६५ कोटी १४ लाख रुपयांच्या मदतीसाठी शासनाला प्रस्ताव

CD

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाअभावी
नऊ लाख ६२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

१३६५ कोटी १४ लाख रुपयांच्या मदतीसाठी शासनाला प्रस्ताव

सूर्यकांत नेटके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाअभावी खरिपातील सुमारे नऊ लाख ६२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. १२ लाख १५ हजार ६६९ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असून, यातील बहुतांश क्षेत्रावरील नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी १३६५ कोटी १४ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात अपुरा पाऊस झाला. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत पावसाने पूर्णतः खंड दिल्याने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद यांसारख्या खरिपातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. शासनाने ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना मदत देण्याची भूमिका घेतली असली, तरी बहुतांश शेतकऱ्यांचे ५० ते ९५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. शासनाने या बाधित क्षेत्राचे पंचनामे केले आहेत.
प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांनुसार आणि शासनाला पाठविलेल्या मदतीच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील १,६१० गावांतील १२ लाख १५ हजार ६६९ शेतकऱ्यांच्या शेतीतील नऊ लाख ६२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात तीन लाख ५४ हजार १८५ हेक्टर जिरायती क्षेत्र असून, पाच लाख ५२ हजार ४३३ हेक्टर बागायती क्षेत्राचा समावेश आहे. जवळपास ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचेही यंदा नुकसान झाले आहे.
शासनाकडून जिरायती क्षेत्रासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टरी आठ हजार ५०० रुपये, बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी १७ हजार रुपये, तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी २२ हजार ५०० रुपये मदत दिली जाते. अहिल्यानगर जिल्ह्यात जिरायती शेतकऱ्यांसाठी ३०१ कोटी १२ लाख रुपये, बागायती शेतकऱ्यांसाठी ९३९ कोटी १५ लाख रुपये, तर फळबागांच्या नुकसानभरपाईसाठी १२४ कोटी ८६ लाख रुपये, अशी एकूण १,३६५ कोटी १४ लाख रुपयांची मदत मिळावी, यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अग्रीम अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानातून ही रक्कम नंतर वजा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टर)
कंसात शेतकरी संख्या
अहिल्यानगर ः५९६३८ (६०६००)
पारनेर ः ८७७०९ (१०९९०८)
पाथर्डी ः ७८४६८ (८८६०६)
कर्जत ः ९४४८४ (१११३९५)
जामखेड ः ६३३४३ (८३२६२)
श्रीगोंदा ः ७७६५६ (१०४८६०)
श्रीरामपुर ः ३६६५७ (४५४२९)
राहूरी ः ६२३४६ (७९८४३)
नेवासा ः ९४६५६ (११५५४६)
शेवगाव ः ७१२७३ (८५९७६)
संगमनेर ः८२१३८ (१२३०७३)
अकोले ः ५७९०५ (८३५७२)
कोपरगाव ः ४७७५४ (६१३९२)
राहाता ः ४८०८३ (५६२०७)
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

Latest Marathi News Live Update : माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, वरून आदेश होते; पण त्यांच्यात कानफाडात मारण्याची हिंमत नव्हती, अजित घोरपडेंचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशारा

Diwali Bonus: राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ७ हजार रुपयांपर्यंत बोनस; सरकारने जाहीर केल्या अटी

SCROLL FOR NEXT