पुणे

भरधाव मोटारीच्या धडकेत विद्यार्थी गंभीर

CD

आंधळगाव, ता. ९ : शाळेच्या बसमधून उतरून आईची वाट पाहत उभ्या असलेल्या ११ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव मोटारीने धडक दिल्याची घटना निर्वी-निमोणे रस्त्यावर शुक्रवारी (ता. ४) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या अपघातात अर्णव भागवत सोनवणे हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी अर्णवची आई योगिता भागवत सोनवणे (वय ३३, रा. निर्वी, ता. शिरूर) यांनी सोमवारी (ता. ७) शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ओंकार अरुण शहाणे (रा. निर्वी, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्णव हा बाबुरावनगर, शिरूर येथील ज्ञानगंगा इंटरनॅशनल विद्यालयात इयत्ता पाचवीत शिकतो. शुक्रवारी दुपारी बसमधून उतरल्यानंतर तो गट क्रमांक २७७ लगतच्या सोलर पंपाजवळ आईची वाट पाहत होता. त्याचवेळी निर्वीहून निमोणेकडे जाणारी निळ्या रंगाची मोटार (क्र. एमएच १२- व्हीक्यू ००७४) भरधाव वेगाने आली आणि चालकाने अर्णवला जोरदार धडक दिली.
धडकेमुळे अर्णव गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चालकाने खाली उतरून पाहिले, मात्र मदत न करता तो मोटारीसह निमोणेच्या दिशेने निघून गेला. अर्णवला प्रथम न्हावरा व त्यानंतर शिरूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. शिरूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, पोलिस हवालदार मोरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT