पुणे

नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमूख धरणात पस्तीस टक्क्यापर्यत पाणीसाठा

CD

अहिल्यानगर जिल्ह्यातील
धरणांत ३५ टक्क्यांवर पाणीसाठा

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन

ॲग्रोवन वॄत्तसेवा
अहिल्यानगर ः जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढली, तरीही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध राहणार आहे. भंडारदरा, मुळा आणि नीळवंडे या तिन्ही मोठ्या धरणांत सरासरी ३५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. आगामी काळात कमी पाऊस पडणार असल्याचे गृहीत धरून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी सरासरी १३० टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील मोठे, मध्यम धरणे आणि लहान तलाव भरले होते. जलजीवन योजनेचेही काही कामे मार्गी लागले आहेत. त्यामुळे काही गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत कोणत्याही गावाला पाणीटंचाई जाणवली नाही. डोंगरी भागातील गावांना पाणीटंचाई निर्माण झाली. संगमनेर, अकोले, पारनेर आणि नगर तालुक्यातील डोंगरी भागातील गावांना पाणीटंचाई निर्माण झाली. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई आराखड्यामध्ये या वर्षी २९ कोटी ४५ लाखांची तरतूद केली. सर्वाधिक २० कोटींची तरतूद टँकरसाठी, तर ५ कोटींची तरतूद नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ४६ गावे आणि २०५ वाड्या-वस्त्यांमधील ७४ हजार ६२१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ४० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये तीन शासकीय तर ३७ खासगी टँकरचा समावेश आहे. हवामान विभागाने ‘एल निनो’चा प्रभाव या वर्षी राहण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

चौकट ----
जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा (दलघफू) कंसात टक्केवारी
भंडारदरा- ४०३० (३७.५३)
निळवंडे- ३१४६ (३९.०५)
मुळा-७६०८ (३५.३९)
आढळा-४५३ (४६.४६)
सीना-५७२ (३०.९७)
विसापूर- १४४ (१६)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT