पुणे

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या आधुनिक यंत्रणेचा वापर शेतीसाठी करावा -करण सिन्हा

CD

एआयद्वारे करा प्रगत शेतीकडे वाटचाल

करण सिन्हा; म्हसवडला माण देशातील शेतकऱ्यांसाठी मेळावा

म्हसवड, ता. ४ : बदलत्या काळात शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही पीक संगोपनासाठीचे तंत्रज्ञान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे मार्गदर्शकपर साधन ठरू शकते. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन माण देशी शेती माती व पाणी परीक्षण केंद्राचे संस्थापक करण सिन्हा यांनी केले.
एमकेसीएल, एनआरसीपी, एचएसबीसी आणि माण देशी फाउंडेशन यांचे विशेष सहकार्याने येथे माण देशी शेती माती व पाणी परीक्षण केंद्रातर्फे शेतकऱ्यांसाठी आयोजित शेती व्यवसायातील कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक कृषी प्रयोग मार्गदर्शनपर मेळाव्यात ते बोलत होते. एमकेसीएल फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वीणा कामथ, म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा वीरकर, शेतीतज्ज्ञ श्री. खेर, आयए तज्ज्ञ नियाज मुलाणी, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, माण देशी फाउंडेशनचे उपाध्यक्ष जवाहर देशमाने, निखिल चिंचकर, प्रदीप कोळेकर आदी उपस्थित होते.
श्री. सिन्हा म्हणाले, ‘‘एआयच्या आधारे शेती केल्यास पीक संगोपन करताना पिकावर संभाव्य किडीच्या प्रादुर्भाव, पिकास पाण्याची गरज, पिकाच्या जमिनीतील आर्द्रता, उन्हाची तीव्रता, वातावरणातील हवेचा वेग यासह संभाव्य पावसाचा अंदाज याची योग्य व अचूक माहिती शेतकऱ्यांनी मिळू शकते. यामुळे पीक सुरक्षित ठेवण्यास व उत्पादन वाढीस मदत होते. माती व पाणी परीक्षणाचे डिजिटल विश्लेषण, रोग-कीड ओळख, तसेच बाजारभाव नियोजन या विषयांवर मेळाव्यात तज्ज्ञाकडून विश्लेषणात्मक माहिती दिली. तंत्रज्ञानामुळे वेळेवर घेतलेले निर्णयामुळे शेती अधिक सक्षम व नफ्याची कशी होऊ शकते याचीही माहिती दिली. भविष्यातही अशा उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

B02397,
B02398
म्हसवड ः कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाबाबत शेतकरी मेळाव्यात सहभागी करण सिन्हा, अनघा कामत आदी.
...................................
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT