पुणे

दुबार नोंदणी ओळखणे होणार सोपे

CD

दुबार नोंदणी ओळखणे होणार सोपे

एआय-सक्षम बायोमेट्रिक शोध प्रणालीमुळे अचूकता  वाढणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २० ः आधार नोंदणी आणि दुबार नोंदी ओळखण्याची अचूकता  वाढविण्यासाठी  भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने  अत्याधुनिक  एआय-सक्षम बायोमेट्रिक दुबार शोध प्रणाली  आणि  कागदपत्र पडताळणी यंत्रणेचा अवलंब केला  आहे.  प्राधिकरणाने  ही सुधारित प्रक्रिया  अनेक राज्यांमध्ये पूर्ण  केली असून लवकरच ती  देशभर लागू  करण्यात येणार आहे.
कोट्यवधी गणना करून अतिशय वेगाने काम करणाऱ्या  बहुस्तरीय एआय संरक्षण प्रणालीच्या साह्याने  भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या  सहकार्याने बोटांचे ठसे, चेहरा, डोळ्यांचे बुब्बूळ (आयरीस) यासाठी स्वदेशी व प्रगत एआय मॉडेल्स विकसित केली आहेत. त्यामुळे नागरिकांचा विश्वास आणि डेटाची विश्वासार्हता सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे.  प्रत्येक नागरिकाला एकच व वेगळी ओळख मिळावी यासाठी बायोमेट्रिक डुप्लिकेट शोध प्रणालींद्वारे प्रत्येक नवीन आधार नोंदणीची संपूर्ण आधार डेटाबेसशी तुलना केली जाते. एनव्हिडिया डीजीएक्स या  उच्च कार्यक्षम संगणकीय पायाभूत सुविधांवर हे मॉडेल्स चालतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरचा डेटा सुरक्षित व कार्यक्षमरीत्या प्रक्रिया करता येतो. डुप्लिकेट नोंदी काढून टाकण्याच्या प्रत्येक व्यवहारात अब्जावधी गणना केल्या जातात.
नोंदणीदरम्यान होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्राधिकरण एआय-आधारित कागदपत्र मेटाडेटा काढून  अधिकृत स्रोतांशी पडताळणी करण्याच्या  पद्धतीचा वापर करीत आहे. कागदपत्रांची खातरजमा करण्यासाठी डीजीलॉकर एपीआयचा वापर केला जातो.या प्लॅटफॉर्ममुळे  कागदपत्रे खरी की बनावट हे लगेच कळते, आधार नोंदणी व अद्ययावत प्रक्रियेला कमी वेळ लागतो  आणि आधारधारक नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता सुधारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Chahar Divorce: क्रिकेटर राहुल चहरचा घटस्फोट!, भाविनक पोस्टद्वारे सोशल मीडियावर झाला व्यक्त

Amravati Crime : भारवाडीनजीक युवकाची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार; मृत व्यक्ती गुजरातचा रहिवासी

Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर; अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, सुनावणीत काय घडलं?

Amravati News : महापालिकेच्या स्थायी समितीत महायुतीचे वर्चस्व, आठ स्वीकृत सदस्यांची निवड

Budget: अजित पवारांच्या निधनाची चौकशी, ९ लाख कोटींचं कर्ज अन्...; 'हे' मुद्दे महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तापवणार!

SCROLL FOR NEXT