पुणे

‘एआय’च्या विकासाला हवी समन्वयाची जोड एआय इम्पॅक्ट इंडिया समिट २०२६ मधील चर्चासत्रात तज्ज्ञांने प्रतिपादन

CD

‘एआय’च्या विकासाला हवी समन्वयाची जोड

चर्चासत्रात तज्ज्ञांने प्रतिपादन; ‘सकाळ’च्या संचालक जान्हवी पवार यांचा सहभाग  

हेडिंंग दिलेले नाही


सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २० ः कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) समाजासाठी खऱ्या अर्थाने उपयोगी ठरणार असेल, तर ती सर्वांनी मिळून विकसित करून वापरली गेली पाहिजे.  उद्योग क्षेत्र, सरकार आणि समाजातील विविध संघटना एकत्र येऊन  ‘एआय’मधील दरी  कशी कमी करू शकतात आणि त्याचे फायदे प्रत्येक नागरिकापर्यंत कसे पोहोचवता येतील, यावर आज  भारत मंडपम येथे आयोजित एआय इम्पॅक्ट इंडिया समिटमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले.  ‘भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी सामूहिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर झालेल्या या चर्चासत्रात ‘एआय’ वापरताना येणाऱ्या  तांत्रिक अडचणी  तसेच  समाजाशी संबंधित अडचणींचा तसेच  सर्वांनी मिळून वापरता येईल अशी  सामायिक पायाभूत सुविधा  आणि  सहकार्याच्या विविध प्रारूपांचा परामर्श घेताना  सकाळ माध्यम समूहाच्या संचालक जान्हवी पवार यांनी तज्ज्ञांशी संवाद साधला. 
या चर्चासत्रात ब्रिस्टल विद्यापीठाचे  प्रा. सेथ बुलॉक,  डॉ. नीरव  अजमेरी, ‘सिविस’च्या  अंतरा वासुदेव,  मॅकेन्झी अँड कंपनीचे कुशे बहल, आयआयटी मुंबईचे प्रा. डी. मंजुनाथ सहभागी झाले होते. जान्हवी पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा हा सारांश. 

जान्हवी पवार :  सरकार, बाजारपेठा किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म्ससह समाजाकडे बघितले तर आपण सहसा बुद्धिमत्तेच्या किंवा डेटाच्या अभावातून समस्या निर्माण झाल्याचे  गृहित धरतो. समाजातील सर्वांत मोठ्या समस्या बुद्धिमत्तेच्या अभावामुळे निर्माण झाल्या आहेत की समन्वयाच्या अपयशातून?  
प्रा. सेथ बुलॉक : आम्ही ज्या परिस्थितीचा सामना करतो त्यात समन्वय हीच बुद्धिमत्ता असते. ‘एआय’शी  एक व्यक्ती म्हणून संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळते. पण संपूर्ण समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बुद्धिमत्तेला समन्वयाची जोड देणे आवश्यक आहे. पूरग्रस्त लोकांच्या, वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या, एखाद्या महामारीने ग्रासलेल्या लोकांच्या किंवा एखाद्या संमेलनासाठी खासगी वाहनांची आवश्यकता असलेल्या लोकांच्या प्रश्नांचे व्यक्तिशः उत्तर देण्याऐवजी ‘एआय’ने अशा लोकांशी समन्वयाद्वारे बुद्धिमत्ता आणि ज्ञान वितरित केले तर त्यातून उत्तम निष्पत्ती साधता येईल. वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून आणि वेगळ्या पद्धतींनी लोकांशी संवाद साधण्याऐवजी संशोधन, कंपन्या, स्वयंसेवी संस्था आणि सरकार यांच्या भागीदारीतून जनतेसाठी एआय विकसित करणे शक्य आहे. भविष्यात एखाद्या ‘एआय’ एजंटशी संवाद साधताना त्याच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण ‘एआय’च्या समुदायाशी संवाद साधू शकतो.  

जान्हवी पवार : बहुविध संस्थांच्या प्रणालींनी  एकमेकांशी संवाद साधल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या बुद्धिमत्तेतून  कोणत्या प्रकारच्या सामाजिक प्रश्नांचे निराकरण होऊ शकेल?

डॉ. नीरव  अजमेरी :  नागरिकांच्या मनात उद्भवणारे प्रश्न सामाजिक-तांत्रिक स्वरुपाचे असतात. लोक आणि संस्था बुद्धिमत्तेशी संबंधित तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन्स वापरतात आणि त्यांची आम्हाला मदत होते. एखाद्या व्यवस्थेचा स्थानिक पातळीवर उपयोग होत असेल पण तिचा जागतिक पातळीवर वापर होत नाही. एखादी महामारी रोखणे किंवा स्रोतांचे योग्य वाटप करणे यांसारख्या समाजहिताच्या बाबी बहुविध स्वरूपाच्या असू शकतात. 

जान्हवी पवार :  फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर एखाद्या वस्तूची चर्चा केली तर त्याची दखल घेत अल्गोरिदम तुमच्या आवडीनिवडीनुसार पर्याय सुचवितात. त्यामुळे मानवी वर्तनावर स्वतःच्या निवडीचा आणि त्यांनी सुचविलेल्या पर्यायांचा कितपत परिणाम होतो?

प्रा. डी. मंजुनाथ  : शिफारस प्रणालींमुळे  आमच्या भावना, सवयी आणि वृत्तीवर होणारे परिणाम हा चिंतेचा विषय आहे. पण हे पर्याय सुचविणारे अल्गोरिदम लर्निंग एजंटस् असतात. ते जाहिरातींशी संबंधित असतात. तुमच्या आवडीनिवडींतून  शिकत असताना ते विविध पर्याय सुचवून तुमची प्रतिक्रिया समजून घेतात. त्यांनी दिलेले पर्याय तुम्हाला एका दिशेने ढकलतात. लोकांवर त्याचा व्यापक परिणाम होतो.

जान्हवी पवार : ‘एआय’मुळे नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले जातात की सरकारला गुंतागुंतीचे व्यवस्थापन करणे शक्य होते? जेव्हा तंत्रज्ञा हे नागरिक आणि सरकारमधील मध्यस्थ बनते तेव्हा नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?

अंतरा वासुदेव : ‘एआय’मुळे कायदा आणि धोरणांविषयी मर्यादित ज्ञान असलेल्या नागरिकांच्या तक्रारी, सूचना ऐकून त्यांच्या शंकांचे निराकरण करणे शक्य होते. भारतासारख्या मोठ्या आणि विविधता असलेल्या देशात ‘एआय’ने सरकारची महत्त्वाची कामे न हाताळलेलीच बरी. ‘एआय’चा वापर करून मसुदा विधेयके आणि धोरणांवर नागरिकांचा प्रतिसाद गोळा करीत आहोत. पुढच्या २२ वर्षांमध्ये नागरिकांच्या इच्छेनुसार राज्याचा कारभार कसा चालवता येईल, हे समजून घेण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आहे. त्यावर ३७ जिल्ह्यांतील ३.८ लाख नागरिकांच्या सर्व स्वरुपातील प्रतिक्रिया आल्या. त्यांचे विश्लेषण महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले. त्यावर आधारित विकसित महाराष्ट्र अहवाल उपलब्ध आहे. भविष्यात महाराष्ट्रात केल्या जाणाऱ्या प्रत्येक कायद्यात नागरिकांच्या मतांना स्थान दिले जाणार आहे. नागरिकांच्या व्यापक सहभागातूनच अशा गोष्टी शक्य होतात. 

जान्हवी पवार : ‘एआय’मुळे भारतातील तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा आल्याच्या भावनेतून प्रचंड चिंता आणि काहीशी उत्कंठा निर्माण झाली आहे. ‘एआय’ नेमक्या कोणत्या प्रकारच्या रोजगारात मनुष्यबळाची जागा घेणार आहे आणि नव्या स्वरुपातील मूल्य आणि भूमिकांची निर्मिती करीत आहे?

कुशे बहल : उदाहरण द्यायचे झाल्यास कॉल सेंटरसारख्या विशिष्ट कामांमध्ये ‘एआय’ मनुष्यबळाचा पर्याय ठरला आहे. एखाद्या गोष्टीवर तुम्ही  शंभर रुपये खर्च करीत असाल तर ‘एआय’मुळे तुमची ४० टक्के बचत होणार आहे. भारतासारख्या जास्त खर्च  होत असलेल्या देशात बचतीची ही टक्केवारी जास्त असू शकते. मनुष्यबळाची जागा ‘एआय’ने  घेतली अशा बहुतांश प्रकरणांमध्ये खर्चकपात  टिकाऊ नसल्याचे आम्हाला आढळले आहे. कॉल सेंटर आणि ‘आयटी’ क्षेत्रात ते जाणवायला लागले आहे. जे काम मनुष्य करू शकत नाही, अशा वेळखाऊ आणि अवघड कामांसाठी ‘एआय’ उपयुक्त ठरले आहे. जास्त खर्च असलेल्या देशांमध्येही  अशा कामांसाठी ‘एआय’ उपयोगाचे ठरले आहे. साध्या कामांसाठी मनुष्यबळाला पर्याय ठरणे यात  ‘एआय’चे  खरे सामर्थ्य  नाही. एआयकडून अवघड कामे करून घेण्यासाठी भरपूर  नवोन्मेष दिसेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT